शहरातील नागरिकांसाठी मंगळवारपासून देना बँकेचे फिरते एटीएम – आ. लक्ष्मण जगताप
पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, प्रदेश सचिव उमा खापरे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य सदाशिव खाडे, एकनाथ पवार, संघटक सरचिटणीस माऊली थोरात उपस्थित होते.
पिंपरी (दि. 20 नोव्हेंबर 2016) जनतेला दिलेले आश्वासन दिनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या तत्वानुसार देशातील गरीब जनतेपर्यंत विकासाची फळे पोहचविण्यासाठी देशातील तिजोरीतील पैसा वापरला जाणार आहे. परंतू कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्ष लोकांच्या भावना भडकविण्याचे काम करीत आहे. तसेच सरकारच्या हेतूविषयी संशय निर्माण करुन मोदी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आगामी आठवडाभरात देशभर चलन पुरवठा होऊन व्यवहार सुरळीत होतील. नागरिकांनी व माध्यमांनी सहकार्य करावे असेही आवाहन खासदार अमर साबळे यांनी केले.
पिंपरी येथे रविवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, प्रदेश सचिव उमा खापरे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य सदाशिव खाडे, एकनाथ पवार, संघटक सरचिटणीस माऊली थोरात, संजय मंगोडेकर, बाबू नायर आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार अमर साबळे म्हणाले की, आठ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयामुळे सीमेवरील दहशतवादाला, देशातील काळ्या बाजाराला, काळ्या पैशाला पायबंद बसेल. यापुर्वी ऑगस्ट 2016 ला बेनामी संपत्ती विषयीचे विधेयक संसदेत संमत करण्यात आले आहे. सप्टेंबर 2016 पर्यंत नागरीकांना आपल्याकडील अघोषित संपत्ती 45 टक्के कर भरुन कायदेशीर करण्याची संधी मोदींनी दिली होती. देशातील फुटीरतावादी गट, दहशतवादी, नक्षलवादी, अंमली पदार्थाचे तस्करी करणारे 500 व 1000 च्या नोटांद्वारे हवालाच्या माध्यमातून काळे धन जमवित होते. यातून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. दोन वर्षांपुर्वी लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचार, काळा पैसा, रोजगार व उद्योग व्यवसायात वाढ करण्याबाबत जाहीरनाम्यात भाजपाने दिलेली आश्वासने पुर्ण करण्याचा महत्वपुर्ण टप्पा या सर्जिकल स्ट्राईकमुळे पुर्ण होत आहे. या निर्णयामुळे 67 हजार कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आणि देश विदेशातील सव्वा लाख कोटी रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाले. हा पैसा वापरण्यात येईल. यामुळे बँकाचा कर्ज वाटपावरील व्याज दर कमी होऊन शेतकरी, लघुउद्योजक, व्यापारी, बेरोजगारांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे. यातून देशातील गरीबीचे व बेरोजगारीचे उच्चाटन होऊन देशाच्या विकास दरात वाढ होईल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेने देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचे मत व्यक्त केले आहे. अशी माहिती खा. अमर साबळे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरामधील नागरिकांच्या सोयीसाठी देना बँकेचे फिरते एटीएम मंगळवारपासून सुरु करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा सहकारी बँका बहुतांशी ठिकाणी राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ शकतात अशी भिती आरबीआयने व्यक्त केल्यामुळे जिल्हा बँकांना नोटा बदली करुन देण्यास मनाई करण्यात आली. धनादेश, डेबिट व क्रेडीट कार्डद्वारे सर्वत्र व्यवहार सुरळीत असून लवकरच बॅकांबाहेरील रांगा बंद होतील असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.