चलन बदलाचा निर्णय जनते विरोधी
सहकार मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्या
पिंपरी (दि.15 नोव्हेंबर 2016) स्वर्गिय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरीबी हटवाचा नारा देऊन देशातील गरीबी हटवण्यासाठी काम केले. तर उद्योगपती धार्जिणे मोदी सरकार आता गरीबांनाच हटवण्याचे महान कार्य करीत असल्याची उपरोधिक टिका पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.
चिंचवड गावातील चापेकर चौकात शनिवारी (दि. 19) सकाळी कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात चलन बदलाच्या निषेधार्थ आंदोलन केले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा ज्योती भारती, सेवा दलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, एआयसीसीच्या सदस्या निगार बारसकर, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, प्रदेश युवा सरचिटणीस चिंतामणी सोंडकर, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, संदेश नवले, राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नागरीक सेलचे लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, चिंचवड विधानसभा युवा अध्यक्ष मयूर जैस्वाल, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, ॲड. क्षितीज गायकवाड, नितीन कांबळे, सोशल मिडिया सेलचे समन्वयक सुनिल राऊत, आशा शहाणे, भास्कर नारखेडे, राजन नायर, सचिन नेटके, गणेश वाल्हेकर, अभिमन्यु दहितुले, अशोक कदम, आण्णा गुंजाळ, रानु मिसाळ, प्रमिला शेटे, मुक्ता कुंटे, विजय मांजरेकर, संतोष क्षिरसागर, एस.टी. कांबळे, रणजित औटे, नंदा तुळसे, लक्ष्मण तुळसे, बाबा बनसोडे, पांडूरंग जगताप, राजेंद्र कोलते, सिध्दार्थ वानखेडे, सौरभ शिंदे, विलास शिंदे, शुभांगी शिंदे, मकरध्वज यादव, गौरव चौधरी, वसंत मोरे, गंगा क्षिरसागर, गौतम रोकडे, वामन ऐनिले, भिमराव जाधव, नितीन बहुले, संजू भाट, वैभव किरवे, सज्जी वर्की, रामचंद्र गाणे आदी उपस्थित होते.
तत्पुर्वी पक्षकार्यालयात स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
सचिन साठे म्हणाले की, आठ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा अचानकपणे घेतलेला निर्णय सामान्य जनतेवर अन्यायकारक आहे. चलन बदलण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहून आजपर्यंत पन्नासहून अधिक नागरिकांना प्राण गमवावा लागला. याला जबाबदार कोण ? ग्रामिण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असणा-या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना नोटा बदलून देण्यास मनाई केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रोजंदारीवर काम करणा-या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अंबानी, अदानी सारख्या उद्योगपतींच्या सल्ल्याने हा निर्णय घेतला असून 125 कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. गुजराती जनतेच्या या निर्णयाची पुर्णकल्पना देण्यात आली होती. या निर्णयामुळे देशभरातील अर्थव्यवहार, उद्योग, व्यवसाय आणि शेतकरी, कामगार संकटात सापडले आहेत. केंद्रातील मंत्र्यांना आणि भाजपाच्या खासदारांना, बड्या उद्योगपतींना हा निर्णय घेतला जाणार असल्याचे माहित होते. त्यामुळेच सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या गाडीत बेहिशोबी 91 लाख रुपयांचे जुने चलन सापडले. शेतकरी व छोट्या गुंतवणूकदारांच्या कष्टाचा पैसा लुटणा-या सुभाष देशमुखांचा नैतिकतेचा दिखावा करणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि त्यांच्या लोकमंगल या मल्टीस्टेट को ऑफ सोसायटीची उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच शॉप ॲक्टचा परवाना काढून देशभर भुछत्रासारख्या फोफावलेल्या क्रेडीट सोसायट्यांची चौकशी करावी अशीही मागणी सचिन साठे यांनी यावेळी केली.
इंदिरा गांधींनी गरीबी हटवली, मोदी गरीबाला हटवतात – सचिन साठे
