पिंपरी : विद्यार्थी व बालकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून सांगण्यासाठी स्थानिक पातळीवर किल्ले बनवा स्पर्धांसारखे उपक्रम आणि कुटूंबातील एकोपा वाढीस लागण्यासाठी गौरी सजावट स्पर्धांसारखे उपक्रम होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेते देवदत्त नागे (‘खडोबा’ मालिकेतील प्रमुख कलाकार) यांनी पिंपरी येथे केले.
कैलासभाऊ कदम स्पोर्टस् क्लबच्या वतीने दिवाळीत घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धांचा आणि गणपती उत्सवात घेतलेल्या गौरी सजावट स्पर्धेचा बक्षिस वितरण सभारंभ सोमवारी बालदिनाचे औचित्य साधून आयोजित केला होता.
यावेळी खंडोबा मालिकेतील कलाकार सुरभी हांडे, ईशा केसकर, बालकलाकार साक्षी तिसगावकर, मिहिर सोनी, संयोजक पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम, नगरसेवक सद्गुरु कदम महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती निर्मला कदम, भारती घाग, आशा साळवी, शितल सिकंदर, बबीता ससाणे, शशीकला साठे, सुनिता जाधव, सुनिता मिसाळ, बेला चौधरी, आनंद फडतरे, अशोक शेडगे, नारायण पाटोळे, बाबूराव कदम, रामचंद्र कड, पंडीत खरात आदी उपस्थित होते.
यावेळी अभिनेते देवदत्त नागे, कलाकार सुरभी हांडे, ईशा केसकर, बालकलाकार साक्षी तिसगावकर, मिहिर सोनी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वाटप करण्यात आले. यामध्ये गौरी सजावट स्पर्धेत प्रथम अमृता कांबळे, व्दितीय वैशाली अष्टेकर, तृतीय कलावती फडतरे, चतुर्थ पूजा आल्हाट, पाचवा मिनाक्षी मंडपे. उत्तेजनार्थ दिलीप शिंदे, धनश्री माने, कुमुदिनी थोरपे, मिरा कसबे, अश्विनी बाबर, सुनीता जगताप, वैशाली पवार, मनीषा सोळे, मयुरा देशमुख, कमल सुर्यवंशी आणि किल्ले बनवा स्पर्धेत प्रथम ऐश्वर्या शिंगाडे, व्दितीय कुजेफ इनामदार, तृतीय अभिषेक मासुळकर, चतुर्थ यशराज ववले, पाचवा हर्ष राठोड, सहावा सार्थक कलापूरे, सातवा शशांक खेंगरे, आठवा लतीफ मुलानी, नववा संस्कृती जवळकर, दहावा जहिला शहा. उत्तेजनार्थ हरीश ओव्हाळ, हाफकीन मित्र मंडळ, श्रीनिधी देशपांडे, अथर्व बाबर, तेजस मावळे, आकाश शेडगे, भावेश साळुंखे, शिवराज ढेरंगे, रितेश तनपुरे, ओम मोरे, संकेत भोसले, बाबू शेख, अथर्व उत्तेकर यांना बक्षिस देण्यात आले.
स्वागत डॉ. कैलास कदम, सुत्रसंचालन नितीन नलावडे, आभार सचिन कदम यांनी मानले.
महाराजांचा इतिहास समजण्यासाठी, संस्कृतीचे जतन होण्यासाठी उपक्रम व्हावेत – देवदत्त नागे
