नोटा रद्द करण्याचा निर्णय कामगारांवर अन्यायकारक…..डॉ. कैलास कदम
पिंपरी : (दि. 28 नोव्हेंबर 2016) फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतेच्या आणि पुरोगामी विचारांच्या विरुध्द निर्णय घेऊन भाजपाने शेतकरी, कामगारांचा अपेक्षाभंग केला आहे. मागिल दोन वर्षात शेतकरी व कामगारांसाठी कोणताही अनुकूल निर्णय घेतला नाही. जनतेचा हा जनआक्रोश व्यक्त करण्यासाठी आज 28 नोव्हेंबरला बंद आयोजित करण्यात आला आहे. राज्यभर स्थानिक निवडणूकात झालेल्या निवडणूकांचा आजचा निकाल पाहता सर्व सामान्य जनतेच्या जनआक्रोशामुळेच भाजपाला जनतेने दिलेली हि चपराक आहे. अशी परखड टिका पिंपरी चिंचवड जिल्हा कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. मोर्चाला जाताना पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
तत्पुर्वी थोर समाज सुधारक महात्मा जोतीबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. माजी विरोधी पक्षनेते ज्येष्ठ नगरसेवक कैलास कदम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेविका गिरीजा कुदळे, महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा ज्योती भारती, सेवा दलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, प्रदेश युवा सरचिटणीस चिंतामणी सोंडकर, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, ज्येष्ठ नागरीक सेलचे लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, चिंचवड विधानसभा युवा अध्यक्ष मयूर जैस्वाल, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, ॲड. क्षितीज गायकवाड, नितीन कांबळे, राजाराम भोंडवे, मकबुल शेख, सर्फराज शेख, राजू पोतीवाल, स्वामी धनगर, हिरामण खवळे, सोशल मिडिया सेलचे समन्वयक सुनिल राऊत, आशा शहाणे, नितीन कांबळे, गणेश वाल्हेकर, अभिमन्यु दहितुले, रणजित औटे, बाबा बनसोडे, पांडूरंग जगताप, सिध्दार्थ वानखेडे, मकरध्वज यादव, गौरव चौधरी, वसंत मोरे, वामन ऐनिले, भिमराव जाधव, वैभव किरवे, सज्जी वर्की आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कैलास कदम म्हणाले की, चलनातून नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा खरा परिणाम 1 डिसेंबर नंतर सर्व कुटूंबांवर होईल. 1 तारखेनंतर जेंव्हा कामगारांचे वेतन बॅंकेत जमा होईल, त्यांनतर किराणा सामान व इतर चीजवस्तू घेण्यासाठी गृहिणींना बँकेच्या बाहेर दिवसभर थांबावे लागेल. तेंव्हा गृहिणींचा या सरकार विरोधी आक्रोश तीव्रतेने व्यक्त होईल. या निर्णयामुळे शहरातील रोजंदारी कंत्राटी तसेच कायम कामगारांच्या कुटूंबियांवर शहरी तसेच ग्रामिण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. सामानय् जनतेचा वेळ व श्रम यामुळे वाया जात आहे. त्यामुळेच ग्रामिण भागातील जनतेने पुन्हा कॉंग्रेसवर विश्वास व्यक्त केला आहे. असेही डॉ. कैलास कदम म्हणाले.