नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा व अनाथाश्रमात ब्लॅकेट वाटप
पिंपरी : (दि. 29 नोव्हेंबर 2016) पिंपरी गावातील संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा, अनाथाश्रमातील मुलांना ब्लॅकेटवाटप आदी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्प्रिंग व्हीजन, इॅक्विटास स्मॉल बँक व संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने पिंपरी गावात मोफत नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. यावेळी अल्पदरात चष्मेवाटपही करण्यात आले. शिबिराचे उदघाटन युवा उद्योजक संदीप वाघेरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, हेमंत वाघेरे, योगेश वाघेरे, जितू वाटकर, रंजना जाधव, नितिन गव्हाणे, गोकूळ भुजबळ, अनिल रसाळ, विठ्ठल जाधव, उमेश खंदारे, हरिश वाघेरे, अभी चव्हाण, किरण वाघेरे आदी उपस्थित होते.
संदीप वाघेरे युवा मंच व साद सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वशांती सामाजिक प्रतिष्ठाणच्या दिघी येथील ज्ञानदीप अनाथ आश्रमातील मुलांची मोफत दंतचिकित्सा करण्यात आली तसेच ब्लॅकेट व खाऊवाटप करण्यात आले. यावेळी युवा उद्योजक संदीप वाघेरे डॉ. अभिजित देशमुख, मंगेश सोनार, इॅक्विटासचे व्यवस्थापक अंबादास संग्राम पाटील, माधुरी मुसळे, दत्ता टकले, संदीप कांबळे, प्रवीण पंड्या, विकास पवार, रंजना जाधव, भाग्यदेव घुले, रुक्मिणी धर्मे, संदीप वाघेरे युवा मंचचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.