# अपचनाने पोटदुखी होत असेल तर कडीपत्त्याच्या खोडाच्या सालीचा तुकडा 4 ते 5 से.मी. घेऊन त्याला अर्धा लिटर पाण्यात उकळवा, पाणी निम्मे आटल्यावर दिवसभर थोडे थोडे करून तो काढा घेतल्यास पोटदुखी कमी होते. या काढ्याच्याच उपयोगाने भूक न लागणे, ढेकर अधिक व पोट फुगणे यासाठी चांगला फायदा होतो.
# अन्न विषाक्ततेमुळे निर्माण होणा-या उलटी आणि जुलाबामध्ये कडीपत्त्याची 8 ते 10 हिरवी पाने सकाळ संध्याकाळी चाऊन खाल्यास फायदा होतो. थकवा कमी होऊन पचनक्रिया परत सुरळीत होते. आवेचा त्रास होत असताना कडीपत्त्याची 8 ते 10 हिरवी पाने वाटून मधासोबत दिल्यास आवेचा त्रास कमी होतो.
# मासे खाणा-यांना जसे तिरफळ पाचक आहे. तसे शाकाहारी लोकांना कढूनिंब हे पाचक. अंगावरती पित्त येणे म्हणजे शीतपित्ताचा त्रास ज्यांना असतो त्यांच्यामध्ये कडीपत्त्याची पाने दररोज 5 ते 10 खावीत याने शीतपित्ताचा त्रास कमी होतो.
# शरीरामध्ये रक्त कसदार नसताना लोहाचे प्रमाण रक्तात कमी असेल त्यावेळी कडीपत्ता घरगुती औषध म्हणून अधिक उपयोगी पडतो. लोहाची कमतरता कमी असल्यास रोज सकाळी 1 खजूर 2 कडीपत्त्याची पाने उपाशीपोटी घेतल्यास लोहाची कमतरता भरून काढता येते.
# अति मद्यपानामुळे यकृतावर आलेला अधिक भार कमी करून यकृताची उत्तेजना चांगली करण्यासाठी उपाशीपोटी 7 ते 8 कढीपत्त्याची पाने चावून खावी. मान जखडणे, दु;खणे, हात पायांना मुंग्या येणे या लक्षणांमध्ये कडीपत्याच्या पानांचा रस दोन दोन थेंब नाकामध्ये जेवणानंतर टाकावा त्याने दुखणे कमी होण्यास मदत होते. मोठया आतड्यामधील पचनशक्ती वाढण्यास कडीपत्त्यामुळे चांगला फायदा होतो त्यामुळे तेथे निर्माण होणा-या वात दोष नियंत्रणात राहून हाडांची बळकटी वाढण्यास मदत होते.
# वजन अधिक वाढले असताना व मेदाची वाढ असताना कडीपत्त्याची 8 ते 10 पाने गरम पाण्यासह घेणे असे पंधरा दिवस केल्यास वजन कमी होते. शरीरावर रक्तवर्णाच्या पुळ्या निर्माण होतात त्यामध्ये कडीपत्त्याची पाने बारीक करून त्याचा लेप लावल्यास त्वचा चांगली होण्यास मदत होते.
# लहान मुले, वृद्ध व्यक्तींमध्ये जेव्हा कृमी (जंत) पोटामध्ये सतत निर्माण होत असतील तर कडीपत्त्याची पानांची पावडर 5 ग्राम गुळाच्या लहान खड्या सोबत घेतल्यास वरून गरम पाणी घेणे असे केल्यास सतत निर्माण होणारे कृमी (जंत) कमी होण्यास मदत होते.
# केसांसाठी – 50 ग्राम कडीपत्त्याची पाने बारीक करून त्यात 200 मिली तीळ तेल आणि 200 मिली पाणी उकळून फक्त तेल काढून घेऊन हे तेल केसांच्या मुळाशी लावल्यास केस गळती, केस पांढरे होणे या समस्या दूर होतात.
# कडीपत्ता घृत – 25 ग्राम कडीपत्त्याची पाने, 25 ग्राम हळद एकत्र करून त्यात 200 मिली तूप व 200 मिली पाणी एकत्र करून उकळविणे व फक्त तूप काढून घेणे या तुपाचा उपयोग दक्षिण भारतात लहान मुलांसाठी केला जातो ऋतू बदलामुळे निर्माण होणारे आजार कमी करण्यासाठी या तुपाचा फायदा होतो रोज सकाळी 1 चमचा तूप गरम पाण्यासह घेतल्यास या कढीपत्ता घृत फायदेशीर आहे.