पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी गवळीमाथा येथील कचरा हस्तांतरण प्रकल्पा॑चे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषद सदस्या उमा खापरे, विधानसभा सदस्य महेश लांडगे, विधानसभा सदस्या अश्विनी जगताप, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त अजय चारठणकर, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, माजी सभागृह नेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, माजी नगरसदस्य आदिंसह महापालिकेचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.