पिंपरी :– मासुळकर कॉलनी, पिंपरी येथील आरक्षण क्र.८५ येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर व आय हॉस्पिटलचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषद सदस्या उमा खापरे, विधानसभा सदस्य महेश लांडगे, विधानसभा सदस्या अश्विनी जगताप, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, कार्यकारी अभियंता संजय खाबडे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे.
नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. रुपाली महेशगौरी, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, माजी सभागृह नेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, माजी नगरसदस्य मंदाकिनी ठाकरे, राजेश पिल्ले, समीर मासुळकर, माजी शिक्षण मंडळ सभापती अर्जुन ठाकरे आदिंसह महापालिकेचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.