पिंपरी:- पुणे जिल्ह्याचे विभाजन करून बारामती जिल्हा तयार करण्यात यावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होत असताना, आता पुन्हा एक नवी मागणी भोसरी विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केली आहे.
पिंपरी चिंचवड शहर आणि त्याला लागून असलेल्या भागाचा झपाट्याने विकास होत असल्यामुळे पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी जिल्हा तयार करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केली आहे. त्यामुळे शिवनेरी जिल्ह्याच्या निर्मितीला आता कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागेल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळ्या विकास कामाचे उद्घाटनासाठी आले होते. यादरम्यान ग. दि. माडगूळकर सभागृहाचे उद्घाटन करत असताना महेश लांडगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुणे जिल्हा विभाजन करून शिवनेरी जिल्हा तयार करण्यात यावा अशी मागणी केली आहे.