पिंपळनेर : गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… अशा घोषणा देत पिंपळनेर येथील प्रचिती पब्लिक स्कूलमधील गणपती बाप्पाला आज दि. २७ रोजी विसर्जन मिरवणुक काढून निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन कार्यक्रमावेळी प्रचिती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम व नृत्य सादर करून सहभाग नोंदविला. शाळेचे चेअरमन प्रशांत भिमराव पाटील, पत्नी कविता पाटील, कन्या प्रचिती व स्वरा यांच्यासह सहपरिवार आरती व सत्यनारायण पूजा करण्यात आली.
गेली दहा दिवस गणेश उत्सवामध्ये शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्सवाचे अचूक नियोजन केले. गणपती बाप्पाची स्थापना राकेश खैरनार, अश्विनी खैरनार या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली. गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी राहुल पाटील, मुख्याध्यापिका तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
दि. 20 रोजी यूकेजी च्या विद्यार्थ्यांनी गणपती वेशभुषा, रिद्धी सिद्धी वेशभूषा सादर केली. नर्सरी व यूकेजीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी मयूरेश्वर गणपतीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच, विद्यार्थी व शिक्षिकांनी अथर्वशीर्ष पठण केले. एलकेजी 1 ली व 2 रीच्या विदयार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले. दि. 21 रोजी युकेजी च्या विद्यार्थ्यांनी आरती केली. 1 ली व २ री च्या विद्यार्थ्यांनी स्तोत्र व गणपतीची गोष्ट सांगितली. सिद्धिविनायक गणपती विषयक माहिती शिक्षकांनी दिली. दि. 22 रोजी गणपतीची आरती 1 ली व 6 वीच्या विद्यार्थ्यांनी केली. 3 री व 4 थीच्या विद्यार्थ्यांनी गणपती गीत सादर केले. बल्लाळेश्वर गणपती विषयी माहिती देवून विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाच्या घोषणा दिल्या. दि. 25 रोजी 2 री व 7 वीच्या विद्यार्थ्यांनी गणपतीची आरती केली. यावेळी 5 वी च्या विद्यार्थ्यांनी छान असे गणेशचे नृत्य सादर केले. दि. 26 रोजी 3री च्या विद्यार्थ्यांना आरतीचा मान मिळाला. 6 वी व 7 वीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. दि. 27 रोजी 4 थी व 5 वीच्या विदयार्थ्यांनी गणपती आरती केली. विघ्नेश्वर गणपती विषयी माहिती यावेळी देण्यात आली. 5 वी, 6 वी व 7वी च्या विदयार्थीनींनी मंगळागौरीचे छान असे नृत्य सादर केले. नृत्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. महाप्रसादानंतर लाडक्या गणरायाचे विसर्जन धुमधडाक्यात लाटीपाडा धरणात करण्यात आले.