पिंपरी– भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार देशातील या चार घटकांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यात देशातील गरीब, तरूण, शेतकरी आणि महिलांचा समावेश आहे. या चार जातींचा विकास होईल तेव्हाच देशाचा विकास होईल, यावर मोदी सरकारचा विश्वास आहे. या चारही घटकांच्या विकासासाठी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. भारत विकसित राष्ट्र करण्यासाठी नारी शक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नारी शक्ती वंदन अभियान कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
शंकर जगताप म्हणाले, “नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून महिलांचा विकास हा केवळ कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता देशाच्या विकासगाथेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. भारताच्या प्रगतीमध्ये महिलांनी बजावलेल्या भूमिकेला पंतप्रधान मोदी यांनी कायमच वंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प साध्य करण्यासाठी देशातील महिला शक्ती ही सर्वात मोठी हमी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. मोदी सरकार महिला सबलीकरण प्रक्रिया अविरत चालवित आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार विविध प्रभावी योजना व उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरणासाठी महिलांना सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने काम करत आहे. महिलांचे सक्षमीकरण ही मोदींची गॅरंटी आहे.
त्यांनी नारी शक्ती वंदन कायदा करून महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे स्टँडअप इंडिया योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, महिला कॉयर विकास योजना, महिला समृद्धी योजना, अन्नपूर्णा योजना, स्त्री शक्ती योजना, पंतप्रधान धनलक्ष्मी योजना, फ्री शिलाई मशीन योजना, पंतप्रधान आवास योजनेत महिलांच्या नावे घर, उज्ज्वला गॅस योजना यांसारख्या विविध योजना राबवून महिलांना सक्षम करण्याचा मार्ग तयार केला आहे. या योजनांचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा.
मोदी सरकार लखपती दिदी बनविण्याची योजना राबवित आहे. त्याअंतर्गत देशातील बचत गटातील एक कोटी महिलांना लखपती दिदी बनविण्यात आले आहे. आता तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनविण्याचे सरकारचे टार्गेट आहे. तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांकडून पाठिंबा मागितला आहे. देशाला विकसित राष्ट्र करताना या तीन कोटी महिलांचे मोठे योगदान असणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील महिलांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.”
यावेळी आमदार अश्विनी जगताप व भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिला, शून्य कचरा संकल्पात योगदान देणाऱ्या महिला, तृतीय पंथीयांसाठी काम करणाऱ्या महिला तसेच समूह संघटिका, आशा वर्कर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार अश्विनी जगताप, भाजपचे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मेडिगेरी, अजय पाताडे, उपाध्यक्ष राजू दुर्गे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळुराम बारणे, माजी नगरसेवक सागर अंघोळकर, प्रमोद ताम्हणकर, बिभीषण चौधरी, योगेश चिंचवडे, महिला आघाडी अध्यक्षा सुजाता पलांडे, माजी नगरसेविका सविता खुळे, संगीता भोंडवे, अश्विनी चिंचवडे, मनीषा पवार, अनुराधा गोरखे, शोभा थोरात, ज्योती भरती, कुंदाताई भिसे, भरती विनोदे, कविता हिंगे, बिंद्रा गणात्रा, शारदा मुंढे, स्वाती नेवाळे, पल्लवी पाटकर, कविता खराडे, पल्लवी वाल्हेकर, पियुषा पाटील, समूह संघटिका रेश्मा पाटील, अश्विनी संगेकर, वैशाली खरात, शारदा धनशेट्टी, सुवर्णा भालेराव, मंगला वाडकर, चंचलाताई जमधडे आदी उपस्थित होते.