पिंपळनेर : येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन मोठया उत्साहात पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्कूलमधील महिला शिक्षक, विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी, स्कूलच्या प्राचार्या अनिता पाटील, समन्वयक राहुल अहिरे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थीनी व महिला शिक्षकांना पुष्पगुच्छ देवून महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळी व फलक लेखन करण्यात आले होते. सुत्रसंचालन सरिता अहिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी किरण देवरे, सारिका अहिरे यांनी पुढाकार घेतला.