“प्रचिती पाटील” हिच्यावर वाढदिवसानिमीत्त शुभेच्छांचा वर्षाव…!
प्रचिती पब्लिक स्कूल येथे केक कापून तर, शासकीय रुग्णालयांमध्ये फरसाण, कपडे वाटून प्रचिती चा वाढदिवस साजरा
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल मंगळवारी प्रचिती प्रशांत पाटील हिचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे समन्वयक राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील व विद्यार्थ्यांनी प्रचिती ला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त नर्सरीच्या विद्यार्थ्यांद्वारे केक कापण्यात आला. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे प्रचितीला गोड शुभेच्छा दिल्या. प्रचितीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू व गरीब लोकांना फरसाण व कपडे वाटप करण्यात आले. तसेच, शासकीय रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले.
“प्रत्येक वाढदिवस सांगे तुमच्या यशाचा आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जावो! तुमच्या समृद्धीचा सागरला किनारा नसावा. तुमच्या आनंदाची फुले सदैव बहरलेली असावीत. आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो.
P -तुम्ही ज्ञानी आणि बौद्धिक आहात.
R- तुम्हाला गोष्टी खोलवर जाणवतात.
A – तुम्ही ध्येयाभिमुख, तळमळ, धाडसी आणि मुक्त विचार करणारे आहात.
C -जेव्हा प्रकरण हृदयाशी संबंधित असते तेव्हा तुम्ही अंतःप्रेरणा आहात.
H -तुम्ही कल्पक, सर्जनशील, कल्पक आणि नाविन्यपूर्ण आहात.
I- तुम्ही काळजी घेणारे, संवेदनशील, दयाळू आहात.
T- तुम्हाला फास्ट लेनमधील जीवन आवडते.
I -तुम्ही काळजी घेणारे, संवेदनशील, दयाळू आहात.
अशा गोड सदिच्छा सर्वांनी दिल्या…”
वाढदिवसानिमित्त शाळेचा परिसर आनंदाने बहरून आला. यावेळी, सर्वशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.