प्रचिती पब्लिक स्कूलच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूलच्या बाप्पाला सत्यनारायण पूजा करून भावपुर्ण वातावरणात निरोप देवून करण्यात आले.शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहुल पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील, शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. श्री गणेश चतुर्थी सणाचे महत्त्व लक्षात घेऊन शाळेत वाजत गाजत श्री गणेशाची विधिवत पूजन करून श्रीकांत पाटील, प्राचार्या अनिता पाटील यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली.
तसेच, सोमवारी शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना आरतीचा मान देण्यात आला. विद्यार्थ्यांसोबत अनिता पाटील, अर्चना देसले, अश्विनी पगार, किरण देवरे, तृप्ती मॅम यांनी श्री गणेशाची आरती केली. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची गणपती बाप्पा गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. मंगळवार दि. १० रोजी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी श्री गणेशाची आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांबरोबर वैशाली वाघ, माधुरी शिंदे, मयुरी सोनार यांनी आरती केली. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची गणपती बाप्पा स्तोत्र घेतले गेले. दि. ११ सप्टेंबर, बुधवार रोजी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आरतीचा मान घेतला. सरिता अहिरे, काजल राजपूत, जागृती बिरारीस, शीतल वाघ यांना आरतीचा मान देण्यात आला. १ ली व २ रीच्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाचे गीत गायन करून कथा देखील सांगितल्या. दि. १३ सप्टेंबर, शुक्रवार रोजी युकेजीच्या विद्यार्थ्यांना आरतीचा मान दिला गेला. विद्यार्थ्यांनी सोबत प्रसाद आणला. सुनीता जाधव यांनी विद्यार्थ्यांबरोबर श्री गणेशाची आरती केली. तसेच विद्यार्थ्यांची गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. दि. १४ सप्टेंबर, शनिवार रोजी एलकेजी व नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी श्री गणेशाची आरती केली. विद्यार्थ्यांबरोबर रीनल मॅम, कल्याणी मॅम , श्रद्धा मॅम यांनी गणपती बाप्पाची आरती केली. तसेच विद्यार्थ्यांनी गणपती गीत गायन केले. श्री गणेश चतुर्थी महोत्सवानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी दररोज शाळेच्या प्रांगणात अथर्वशीर्षाचे पठण केले.
दि. १६ सप्टेंबर, सोमवार रोजी प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये अनंत चतुर्दशी निमित्ताने सत्यनारायण पूजा करण्यात आली. राहुल अहिरे, पल्लवी अहिरे यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. सत्यनारायण पूजेसाठी शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील, शाळेच्या सेक्रेटरी कविता पाटील, प्रचिती पाटील, स्वरा पाटील , खुशी पाटील उपस्थित होत्या. शाळेचे समन्वयक राहुल पाटील व शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील, शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते. या दिवशी शिक्षकांनी अष्टविनायक गणपतीची माहिती सांगितली. शिक्षकांनी गणपतीची कथा सांगून स्तोत्र गायले. त्यानंतर श्री गणेशाची आरती करण्यात करून सर्वांना मोदकांचा प्रसाद देण्यात आला. विघ्नेश कोठावदे याने गणपती बाप्पाची वेषभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधले.
या कार्यक्रमासाठी तृप्ती मुसळे, सुनीता जाधव, रिनल सोनवणे यांनी रांगोळी रेखाटली. फलक लेखन सरिता अहिरे, सुनीता जाधव, श्रद्धा मॅम यांनी केलं. सजावट अर्चना देसले, सुनीता जाधव, किरण देवरे, अश्विनी पगार यांनी केली. छायाचित्र काजल राजपूत यांनी तर कल्याणी काकुस्ते यांनी चित्रफीत केले. या कार्यक्रमासाठी इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले. त्यांना मार्गदर्शन तृप्ती मुसळे यांनी केले. तसेच इयत्ता सहावी व सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. त्यांना काजल राजपूत, सुनीता जाधव यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संयोजन माधुरी शिंदे, वैशाली वाघ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली वाघ यांनी केले. स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. त्यानंतर वाजत गाजत गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. लाटी पाडा धरण येथे भावपूर्ण नयनांनी बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. सर्वांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत गणपती बाप्पाला निरोप दिला. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.