प्रचिती पब्लिक स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे रविवारी ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्सव साजरा करण्यात आला.
प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे शाळेचे चेअरमन प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अशोक शंकर खैरनार (लेफ्टनंट जनरल मराठा बटालियन )हे उपस्थित होते. यावेळी शाळेचे समन्वय राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी परेड करून पाहुण्यांचे स्वागत केले. मान्यवरांच्या ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देत झेंडा गीत व घोषणा देण्यात आल्या. प्रसंगी, बालगोपाळांनी महापुरुषांची वेशभूषा परिधान करून उपस्थितांना प्रभावित केले.
ईश्वरी नंदन व काव्या घरटे – भारत माता, ज्ञानेश्वरी पवार – जिजामाता, अन्वी शेवाळे, आराध्या पाटील, सलोनी खैरनार यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली. तसेच अरनवी काकुस्ते, आरव काकुस्ते – सैनिक, गुरुराज बिरारीस-नेताजी सुभाषचंद्र बोस, मनीष बच्छाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दीक्षिता पवार – झाशीची राणी, ज्ञानेश्वरी देसाई – इंदिरा गांधी यांनी देखील महापुरुषांची वेशभूषा साकारून सर्वांची मने जिंकली.
सुनिता जाधव, मयुरी सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी डंबेल डान्स सादर केला. इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. त्यांना किरण देवरे यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांनी पिरामिड डान्स सादर केला. त्यांना रिनल सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सरिता अहिरे, कल्याणी काकुस्ते, अर्चना देसले, मयुरी सोनार , वैशाली वाघ यांनी सुंदर असे बॅनर तयार केले. फलक लेखन अश्विनी पगार, रिनल सोनवणे यांनी केले. सुंदर रांगोळीचे रेखाटन योजना मॅडम, अनिता पवार, नेहा शिरसाठ यांनी केले. झेंडा सजावट पल्लवी अहिरे व काजल राजपूत यांनी केली. सरिता अहिरे, सुनिता जाधव यांनी भाषणे केली. रुपेश कुवर यांनी सुंदर असे गीत सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील व शाळेचे समन्वयक राहुल पाटील, सुनिता जाधव, सरिता आहेरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा व भाषणे दिली. शिक्षिका मयुरी यांनी भारताचे संविधान वाचन केले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना लाडु व बिस्कुटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता अर्चना देसले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण देवरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन जागृती बिरारीस यांनी केले.