“प्रचिती इंटरनॅशनल स्कूल” प्री प्रायमरी च्या विद्यार्थ्यांची भक्तिमय वारी
शेणपूर व मलांजन गावांतून निघाली “माऊली”ची पालखी टाळ-मृदंगाच्या गजरात
साक्री (प्रतिनिधी) – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साक्री यांच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्री प्रायमरी नर्सरी ते पहिली च्या विद्यार्थ्यांसोबत शेणपूर व मलांजन येथे वारकरी परंपरेचा भक्तिमय व सांस्कृतिक वारी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून वारीचा सजीव अनुभव सादर करत गावकऱ्यांची मने जिंकली.
कार्यक्रमांमध्ये नर्सरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे इनचार्ज श्री प्रफुल साळुंखे सर, गणेश नांद्रे सर व श्रीमती प्रभावती चौधरी मॅडम यांच्या देखरेखी खाली यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांमध्ये पांडुरंगाच्या पालखीची भव्य सजावट आणि रंगीबेरंगी विठ्ठल-रुक्मिणीच्या रांगोळ्या होत्या. या रांगोळी सजावटीचे विशेष श्रेय दिपमाला मॅम व सविता लाडे मॅडम, जितेंद्र कासार सर यांना जाते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने अतिशय कलात्मक व सुंदर रांगोळ्या रेखाटल्या, ज्या कार्यक्रमाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या ठरल्या. इव्हेंट मॅनेजमेंटचे नियोजन श्री प्रफुल सर , श्री गणेश नांद्रे सर व श्रीमती प्रभावती चौधरी मॅडम यांनी अतिशय प्रभावीपणे सांभाळले. संपूर्ण वारीचे नियोजन, संकल्पना, सादरीकरण आणि शिस्त यामुळे कार्यक्रम अत्यंत देखणा झाला. विद्यार्थ्यांनी “माऊली माऊली”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल”, “ज्ञानोबा तुकाराम” या अभंगांच्या माध्यमातून भक्तीची भावना जागवली.
गावातून निघालेल्या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हावून निघाला. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री. प्रशांत भिमराव पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी फोनद्वारे शुभेच्छा देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिशा देतात, असे मत व्यक्त केले. प्राचार्य सौ. वैशाली लाडे मॅडम, समन्वयक श्री. तुषार देवरे सर, श्री. वैभव सोनवणे सर, यांच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि स्थानिक ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, शिस्त आणि परंपरेचे जतन याचे बीज रोवणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.