पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांचे आज दि.२६ रोजी आकस्मित निधन झाले आहे. पुण्यातील एका खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
चिंचवडमधील बिजलीनगर प्रभागातून २००७ साली शिवसेनेच्या तिकीटावर ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे कार्य होते. सतत हसतमुख स्वभावामुळे मोठा मित्र परिवार त्यांचा होता. त्यांच्या या आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होते. आज सायंकाळी ४ वाजता निगडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.