पिंपरी ः झेंसार टेक्नॉलॉजी या विख्यात माहिती व तंत्रज्ञान कंपनी आणि डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डीचे डॉ. डि. वाय पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग, मॅनेजमेंट अँड रिसर्च, आकुर्डीसोबत सांमजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत कंपनीने तृतीय वर्षातील संगणक विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. तसेच शेवट्याच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली आहे. तसेच त्यांनी संस्थेसाठी दोन प्रकारचे कार्यक्रम ठरविले आहेत. पहिल्या प्रकारात कंपनीतर्फे झेंसार ईएसडी प्रोग्राम अंर्तगत अनेक विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे (करपवी जप) प्रात्यक्षिकाच्या प्रशिक्षणाचा अंतर्भाव केला आहे. दुसर्या कार्यक्रमांतर्गत कंपनीतर्फे प्राध्यापकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. करार प्रस्थापित करण्यासाठी डीन प्लेसमेंट जस्मीता कौर यांचा सिंहाचा वाटा आहे, तसेच संगणक विभागप्रमुख प्रा. प्रतिक्षा शेवतेकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा. गौरव गुप्ता यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा सांमजस्य करार करण्यासाठी संस्थेचे चेअरमन आमदार सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक (निवृत्त) कर्नल एस. के. जोशी, प्राचार्यां डॉ. अनुपमा पाटील व कुलसचिव वाय. के. पाटील यांनी प्रोत्साहन दिले.
झेंसार टेक्नॉलॉजीसोबत डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डीचा सांमजस्य करार
