पिंपरी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवार (दि. 27) रोजी जाहीर झाली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल 19 जणांनी 31 अर्ज, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी 9 जणांनी 15 आणि भोसरीसाठी 8 जणांनी 13 अर्ज नेले आहेत. दरम्यान, तीनही विधानसभा मतदारसंघातून पहिल्यादिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील अर्जाचे वाटप, स्वीकृती आणि चिन्हांचे वाटप आकुर्डीतील डॉ. हेडगेवार भवन येथून होत आहे. पहिल्या दिवशी 31 अर्ज नेले असून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज वाटप केले जात असल्याचे पिंपरीच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी- उंटवाल यांनी सांगितले.
पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेसाठी पहिल्या दिवशी ३६ अर्जांची खरेदी
