चिखलीतील भव्य मेळाव्यात महिलांची गर्दी; चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र बांधकामाला सुरुवात
भोसरी : भोसरी मतदारसंघातील गरजू, आजारी रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दीड कोटीची मदत केली. मोशीतील कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प केला. संत पीठासाठी जागा मिळवून त्याचे काम सुरु केले. पुणे-आळंदी रस्ता केला. अवैध बांधकामाच्या एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा शास्तीकर माफ केला. समाविष्ट गावातील नारिकांची तहान भागविण्यासाठी चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत असून त्यातील 100 एमएलडी पाणी केवळ चार गावांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावातील वाढत्या लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून चिखलीग्रामस्थांच्या वतीने परिसरातील कार्यकर्त्यांचा इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात भव्य विजयी संकल्प मेळावा गुरुवारी (दि.27) पार पडला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार लांडगे बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव यांच्यासह चिखलीगावातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी पाठिंबा जाहीर केला. तसेच यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवा दलाचे अध्यक्ष आनंदा यादव, पंडीत मोरे, रोहिदास मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
केवळ कचर्याचे डोंगर उभारले…
आमदार महेश लांडगे म्हणाले, भोसरी मतदारसंघातील गरजू, आजारी रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दीड कोटीची मदत केली. मोशीच्या कचरा डेपोत 2017 पासून कचरा जमा होत नाही. गेल्या 20 वर्षांपासून जमा होणार्या कच-याचे काय केले. केवळ कचर्याचे डोंगर उभे केले आहेत. कचर्यावर प्रक्रिया करण्याचे सूचले नाही. आम्ही ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प केला. त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतात. आम्ही पण कचर्याचे डोंगर उभे करायचे का? असा खडा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आणला. संत पीठासाठी जागा मिळवून त्याचे काम सुरु केले. पुणे-आळंदी रस्ता केला. शब्द दिला तो पूर्ण केला आहे. 2014 ला सांगितलेले प्रश्न मार्गी लावले आहे
समाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्न सुटेल…
अवैध बांधकामाच्या एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा शास्तीकर माफ केला. ज्यांनी शास्तीकर आणला ते आज आम्हाला काय केले विचारतात. समाविष्ट गावात अनेक वर्षांपासून पाण्याची ओरड असताना पाणी आणण्याचे नियोजन केले नाही. आम्ही आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणत आहोत. चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील 100 एमएलडी पाणी केवळ चार गावासाठी आहे. काम पूर्ण झाल्यावर समाविष्ट गावातील वाढत्या लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी खात्री आहे, असेही ते म्हणाले.
अगोदरच्या पुढार्यांनी भांडणे लावली…
अगोदरच्या पुढार्यांंनी घराघरात, गावागावात भांडणे लावली. दोन गट पाडले. पण आज गावातील प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते एका व्यासपीठावर येतात. त्यामुळे ख-या अर्थाने विजयी झालेसारखे वाटते. राजकारणाने लोक जवळ येत नाहीत. प्रेमाने आणि आपुलकीने जवळ येतात. चिखलीगावाला राजकाणाची नसून सांप्रादयाची परंपरा आहे. सांप्रादय रुचेल असे गावाच्या एकत्रीकरणाने दिसत आहे. एकही विरोधकाच्या बाबतीत चुकीचा शब्द काढला नाही. राजकाराणाची नवीन वाटचाल सुरु आहे. यापूर्वी निवडणूक आली की घरातील महिलांना ताण असायचा. पण, आम्ही भोसरीत आदरयुक्त राजकारण चालू केले आहे. भोसरी मतदारसंघात निवडून आलेले नगरसेवक ध्येयाने वेडे झाले आहेत. जबाबादारी पार पाडण्यासाठी ते अहोरात्र झटत आहे, असे लांडगे म्हणाले. यावेळी, महापौर राहुल जाधव, सभापती गीताराम मोरे, माजी उपसरपंच यशवंत साने, जितेंद्र यादव, स्वीनल म्हेत्रे, सुरेश म्हेत्रे यांनी मत व्यक्त केले.