चिंचवड ः येथील अग्रसेन ट्रस्ट चिंचवड-प्राधिकरण व अग्रवाल महिला मंडळ प्राधिकरण निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री अग्रसेन महाराज जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या संगीतमय तंबोला कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी कोहिनूर ग्रूपच्या राजबाला किशन गोयल, जी. जी. इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सोनू अरुण गुप्ता या प्रमुख पाहुण्या म्हणून तर अग्रवाल महिला समाज मंडळाच्या अध्यक्षा मंजू बंसल, सचिव रजनी गोयल आदी उपस्थित होत्या.
यावेळी गुप्ता म्हणाल्या कि, आपल्याला केवळ शाळेतच ज्ञान प्राप्त होत नाही तर इतर माध्यमातून काहीतरी शिकायला मिळतेच. शिकायला वयाची अट नसते. प्रत्येक मुलांमध्ये काहीतरी सदगुण असतो. आपल्या मुलांवर संस्कार करताना त्यांच्यातील सदगुणांना वाव द्या.त्यामुळे त्याला प्रेरणा मिळेल व त्याच्यातील दुर्गुण हळूहळू नाहीसे होईल. गायक निवेदक संदीप पंचवाटकर यांनी सादर केलेल्या अग्रसेन भवनमध्ये संगीतमय तंबोला कार्यक्रमात दोनशे महिला सहभागी झाल्या होत्या.सर्व महिलांनी फिल्मी गीत सादर केल्याने कार्यक्रमाला एक वेगळी रंगत आली. हाउजी गेममध्ये आराधना बंसल (प्रथम), सावि गोयल (द्वितीय), सृष्टी मित्तल (तृतीय), कविता गोयल, उषा आगरवाल, सुमन गोयल, खुशी तायल, सृष्टी गोयल, सौ. निशा या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.