पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी असल्याने परिसरामध्ये चाकरमान्यांची प्रवासी संख्या लक्षणीय आहे. या ठिकाणी अनेक एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे. चिंचवड परिसरामधून पुणे आणि लोणावळा येथे जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे चिंचवड स्टेशन परिसरात मिनरल वॉटर, दही, मसाला ताक, बिस्कीट या वेगवेगळ््या खाद्यपदार्थांची विक्री जादा दराने होत आहे.
प्रवाशांना तक्रार कोणाकडे करायची याची पुरेशी माहिती नसल्याने स्टेशन परिसरातील टपऱ्यांचा धंदा तेजीत सुरू आहे. रेल्वे प्रशासन याकडे काणाडोळा करत असल्याचे चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे. लोकमत प्रतिनिधीने शहरातील प्रमुख रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भेट दिली असता असे निदर्शनास आले. की, मिनरल वॉटर, बिस्कीट, लस्सी, दूध, श्रीखंड, मसाला ताक, आम्रखंड या वस्तू जास्त दराने विकल्या आहेत. यामुळे रेल्वेच्या या गलथान कारभाराकडे दुर्लक्ष होत आहे.