पिंपळनेर : येथील शेकडो भाविक संख्येने सप्तश्रृंगी गडाच्या दिशेने खांद्यावर कवाड, पालखी व काठी घेऊन पायी रवाना झाले. यात महिला, पुरुष व तरुणाईचा समावेश आहे. अंबे की जय असा घोष करीत पदयात्रेने गडाकडे कूच केली आहे.
नंदुरबार जिल्हयातील शहादा, तळोदा तालुक्यातील हजारो भाविक पायी दिंडीने सप्तश्रृंगी गडाच्या दिशेने रवाना झाले. डीजेवर संगीत लावून नाचत, गात माता सप्तश्रृंगी देवीचे गुणगान करीत आहेत. यावर्षी आदिवासी भिल्ल समाजातील भाविकांची संख्या अधिक आहे. जागृती मित्र मंडळाने पदयात्रेचे संयोजन केले आहे. पिंपळनेर गावातून मुख्य रस्त्यावरून पदयात्रा मार्गस्थ झाली. काही दात्यांनी भाविकांच्या नास्त्याची सोय केली. ठिकठिकाणी पिण्याचे पाणी व थंड पेयाची सुविधा केली आहे.