पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने महादेव जानकर यांच्या निषेधार्थ रास्ता पेठमधील पॉवर हाऊस चौकात ’निषेध आंदोलन’ करण्यात आले.
भगवानगडाच्या सभेत पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा परिषद नेते धनंजय मुंडे यांच्यवर बेताल टिका करून अपशब्द वापरल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, नूरमोहम्मद तांबे, उद्धव बडदे, संदीप लडकत, रविंद्र माळवदकर, मुस्ताक पटेल, नितीन रोकडे, मयूर गायकवाड, निवास लादे, विनोद उबाळे, विनोद काळोखे, नरेश जाधव, शैलेश म्हेत्रे, फईम शेख, रुपेश डाके, शशिकला ढोलेपाटील, मीना पवार, अॅड. बाळासाहेब बरके, नितीन सोनवणे, महेंद्र लालबिगे, सुनील भोईटे, हेमराज कवडे, शैलेंद्र जाधव, दिनेश बाराथे, जितू कदम, योगेश पवार, सत्तारभाई, सोनू काळे, संध्या राठोड, अलका दडाते, माधुरी भांडेकर, अक्षया गोखले, संगीता जयस्वाल, अनुश्री राऊत आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महादेव जानकर यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन
![महादेव जानकर यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन](https://chaupher.com/wp-content/uploads/2016/10/NCP.jpg)