पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहर हरित करण्याचा संकल्प केला खरा मात्र गेल्या पाच वर्षात किती झाडे जगविली याबाबत उद्यान विभागाच्या प्रशासनाकडे आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे झाडे लावा झाले मात्र झाडे जगवा ही योजना केवळ कागदावरच राहिली असेच म्हणावे लागेल.
महापालिकेने लावलेल्या वृक्ष लागवडीतून प्रत्यक्षात किती वृक्ष जगले की, सगळे वृक्ष गायब झाले. याविषयी बोलण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. सन 2003 – 04 या कालावधीत केलेल्या वृक्ष गणननेनूसार शहरात सुमारे 17 लाख 59 हजार 012 वृक्ष संख्या आढळून आलेली आहे. परंतू, येत्या पाच वर्षांतील वृक्षाची आकडेवारी उद्यान विभागाकडे नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात उद्यान विभागातर्फे सन 2012 पासून आजपर्यंत सुमारे 2 लाख 40 हजार वृक्षाची लागवड करण्यात आल्याची नोंद आहे. यावर महापालिकेने सन 2012 – 13 ते 2016 – 17 या कालावधीत वृक्षारोपणावर साधारणता 10 कोटी 75 लाख 7 हजार 712 एवढा अवाढव्य खर्च करण्यात आलेला आहे.