पिंपरी : एसकेफ युनियन कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विविध पदांवर जुन्याच पदाधिकार्यांना कामगारांनी पुन्हा एकदा निवडून दिले.
नुकताच झालेला वेतनवाढीचा करार, कामगारांतील शॉप फ्लोअर वातावरण, नवीन योजनांचा वेतन करारात समावेश या सर्व गोष्टी व्यवस्थित असल्याने कामगारांनी पुन्हा चंद्रकांत लिंगायत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत जुन्या व्यवस्थापक समितीवर पुन्हा विश्वास दाखवला आहे.
निवडणुकीपूर्वी जुलैमध्ये याच समितीने 12 हजार 500 रुपयांचा वेतनवाढीचा करार केला होता. या वेतनवाढीवर कामगार समाधानी असल्याने व्यवस्थापक समितीवर पुन्हा त्याच पदाधिकार्यांना कामगारांनी निवडून दिले.
एसकेएफ युनियन कामगार संघटनेची 2016-2019 कालावधीतील त्रैवार्षिक व्यवस्थापक समिती खालीलप्रमाणे –
अध्यक्ष – चंद्रकांत लिंगायत, उपाध्यक्ष – संजय तांडले, अनिल चिंचवडे, सेक्रेटरी – बाळकृष्ण पनीकर, सहसचिव – डेव्हिड सालोमन, खजिनदार – बाळासाहेब शिंदे, खाते प्रतिनिधी – डीजीबीबी ग्राईडिंग- 1) शैलेश विद्वांस 2) सुनील माळवे, डीजीबीबी असेब्लिंग- 1) बापू पाटील 2) अनिल घोरपडे, टीआरबी ग्राईडिंग – 1) प्रताप मते 2) सुर्यकांत चांदणे, टीआरबी असेंब्ली- 1)अशोक भुजबळ 2) एम. पी. पाटील 3) शिवभक्त तंबी, मेंटेनन्स – 1) रफिक पीरजादे 2) प्रशांत भोसले, रोलर – 1) राजेंद्र क्षीरसागर 2) सुभाष चव्हाण, क्वॉलिटी – 1) अविनाश शिंदे, स्टोअर – रविंद्र वाल्हेकर (विनाविरोध), ज्युनिअर स्टाफ – रणधीर पवार (विनाविरोध), हीट ट्रीटमेंट – दिनकर बंगेरा (विनाविरोध), फेस अँड ऑडी – पी. टी. राजू (विनाविरोध), निवडणूक अधिकारी विवेक पै यांनी वरील निकाल घोषित केला. विनायक घोलप, नवनाथ तापकीर, अनुजा कुलकर्णी यांनी निवडणुकांसाठी विशेष परिश्रम घेतले.