निसर्गमित्र समितीचा उपक्रम
धुळे : धुणीभांडी करणार्या विधावा, परित्यक्त्या व गरीब महिलांना निसर्गमित्र समितीतर्फे दिवाळीनिमित्त साडी व फरसाणचे वाटप समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी निसर्गमित्र समितीचे प्रदेश सचिव तथा केंद्रप्रमुख संतोष पाटील होते तर भोकरचे सरपंच मंगलदास पाटील, मालेगाव तालुकाध्यक्ष प्रा. दीपक देशमुख, शिंदखेडा तालुकाध्यक्ष एम.आर.जाधव आदी उपस्थित होते. गरीब महिलांना साडी वाटप करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव पगार, शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष आर.आर.सोनवणे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
याप्रसंगी प्रथम वृक्षारोपणाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धुळे तालुकाध्यक्ष उमाकांत पाटील, धुळे तालुका कार्याध्यक्ष प्रा.जयवंत भामरे, जिल्हा संघटक राजेंद्र ढोडरे व संजय गोसावी, साक्री तालुकाध्यक्ष गोकूळ पाटील, कार्यालय व्यवस्थापक निसर्ग अहिरे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रा. दीपक देशमुख, एफ. आर. जाधव यांना औरंगाबाद येथे शिवर्रंपुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. प्रास्ताविक, सूत्रसंचालन राजेंद्र ढोडरे यांनी तर आभार आर.आर.सोनवणे यांनी मानले.