पिंपरी :- भोपाळ येथे झालेल्या 65 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अरुण पाडुळे स्पोर्ट्स फाउंडेशन मधील अनुष्का राजेश गारगोटे, नंदिनी यादव, भक्ती नारायनकर यांची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी मध्ये निवड झाली आहे. तसेच आताच झालेल्या युनिव्हर्सिटी स्पर्धेतून अनुष्का बाबर हिची मेरठ येथे होणाऱ्या राष्ट्रीय युनिव्हर्सिटी स्पर्धेत निवड झाली आहे.
आताच झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत हर्षद पाडुळे यांना युथ गटात रौप्यपदक, भक्ती नारायनकर हिला युथ गटात सुवर्णपदक, राजनंदिनी यादव हिला रौप्यपदक, अनुष्का गारगोटे हिला ज्युनियर गटात रौप्यपदक व श्रीधर सचिन जरे यांना सब युथ गटात कांस्यपदक मिळाले आहे.
नेमबाजी या खेळाला पिंपरी चिंचवडमध्ये अरुण पाडुळे यांच्या आकुर्डी येथील प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अनेक प्रतिभावंत खेळाडू घडत आहेत. आतापर्यंत अरुण सर पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखालील 20 ते 25 खेळाडू हे राष्ट्रीय पातळीवर पिंपरी चिंचवडच प्रतिनिधित्व करीत आहेत. येणाऱ्या काळात आता निवड झालेले नेमबाज आंतरराष्ट्रीय स्पर्धेतुन पिंपरी चिंचवडला नक्की पदके मिळेवुन देतील असा विश्वास प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख व मुख्य प्रशिक्षक अरुण सर पाडुळे यांनी दिला. हे सर्व नेमबाज राष्ट्रीय खेळाडू अरुण सर पाडुळे तसेच सह प्रशिक्षक कविता अरुण पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.