मुंबई – महात्मा फुले जन आरोग्य योजनेत अस्थिव्यंग, गतिमंद, न्यूरोजीकल या आजारांचा समावेश होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.
डॉ. तानाजी सावंत म्हणाले, राज्यात स्वमग्नता, गतिमंद, न्यूरोजीकल आजारी मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशभरात ०.१ टक्के मुले या आजारांनी त्रस्त आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार प्रत्येक १६० मुलांमागे एक मुलाला हा आजार आहे. परंतु शासकीय, जिल्हा व निमशासकीय रूग्णालयात या मुलांवरील उपचारांच्या सुविधा खूप कमी असल्याचे त्यांनी म्हटले. जिल्हा निहाय उपचार केंद्र सुरू करण्यासोबतच या रुग्णांवरील उपचारांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात येईल. असे अश्वासन सभागृहाला दिले.