सोलापूर – ‘कोणी मुलगी देता का मुलगी’ बाशिंग बांधून घोड्यावर स्वार होत विवाहासाठी इच्छुक असलेल्या तरूणांनी नवरदेवाच्या वेशामध्ये सोलापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
लग्न न झालेल्या तरूण मुलांनी लग्नासाठी मुलगी देण्याची मागणी करत काही तरूणांनी सोलापूरातील होम मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. बाशिंग बांधून नवरदेवाचे वेशात घोड्यावर स्वार होत या तरूणांनी हातात कोणी मुलगी देता का मुलगी लग्नासाठी या पामराला बेटी बचाओ अशा मजकुराचे फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने कूच केली.
रमेश बारस्कर म्हणाले, तरूणांच वय २५, ३०, ३५, ४० वर्षे होऊनही त्यांची लग्न झालेली नाहीत. त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती चांगली नाही. कोणाला अटॅक येतो. कोणाला शुगर आहे. कोणाला बीपीचा त्रास होतोय. केरळमध्ये १ हजार मुलांमागे १०५० मुली आहेत. भारतात १ हजार मुलांमागे ९४० मुली आहेत आणि महाराष्ट्रात १ हजार मुलांमागे ८८९ मुली आहेत. ही तफावत मलीची हत्या केल्या. मुली नाकारल्यामुळे आहे. त्या मुळे ही परिस्थीती निर्माण झाली असून यासाठी सरकार जबाबदार आहे.
नवरदेव म्हणाले, लहान असताना बहिण आम्हाला म्हणायची दादा मला एक वहिनी आण, त्याच काळात सरकारने गर्भलिंग निदान चाचणी कायदा केला. परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे न झाल्याने माझ्यासारखा अनेक मुलांना तरूणपणी भोगावे लागत आहेत.