छडवेल कोर्डे : राजकीय व सामाजिक प्रश्नांची जाण, इतिहासाचा सवंग अभ्यास असणारे आणि कुठलेही मतभेद न ठेवता सर्वांसाठी धडपणारे व्यक्तीमत्व म्हणजे पंडित आबा बेडसे होय. त्यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तीमत्वाचा घेतलेला हा वेध.

3 डिसेंबर 1969 रोजी छडवेल कोर्डे गावात पंडित आबा बेडसे यांचा जन्म झाला. आई अंजिराबाई अन वडील गुलाबराव बेडसे यांच्याकडून पवित्र संस्कार आबांना मिळाले. जुन्या संस्कृतीवर राष्ट्रवादाची नवी इमारत बांधण्याची प्रगल्भता त्यांनी जोपासली. माध्यमिक शिक्षण मायभूमीत केले. पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले. समाज सेवेला महत्व देऊन प्रेम, सहवास, बंध, सूर, मैत्री याचा आधार घेत जीवन मैफल सजवली. त्यांनी वाणी आणि लेखणीतून समाजनिष्ठा विचारांची पूजा बांधत पत्रकारितेचा आरंभ केला. नजरेत भरलेले दृश्य, कानावर पडलेले संदर्भिय वाक्य अनुभवलेल्या सुख, दु:खाला शब्दांचे रुप मिळवून दिले. सामाजिक प्रश्‍नांना वाचा फोडली. यातूनच बोरमळा तलावाचा प्रश्न मार्गी लागला. बेरोजगारीवर मात करण्यासाठी सुजलॉन एनर्जीसारख्या प्रकल्पात शेकडो तरुणांना रोजगाराची संधी मिळवून दिली. बी.एस.एन.एल.टॉवर कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्‍्‍न करुन छडवेल जगाच्या स्पर्धेत आणले. छडवेल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यासाठी त्यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला. वॉर्ड नं. 3 मधील नागरीकांना 200 केव्हीचा ट्रान्सफार्मर कार्यान्वीत करुन विजेचा प्रश्न सोडविला.

बोरमळा तलावाची दुरुस्ती, ईसर्डे व पन्हाळीपाडा रस्त्याचे डांबरीकरण, बोरमळा तलावाजवळ फरशीचे काम, मोदी नगरात वीजेचे खांब टाकुन वीज पोचविले. 32 गावांचा विजेचा प्रश्न सुटावा म्हणून मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. त्याला 60 लाख रुपये मंजूर करुन परिसरातील गावांचा विजेचा प्रश्न सोडविला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here