राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता अर्ज मागविण्यात आले आहे.
सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ०६.०४.२०२३ पासून दिनांक २०.०४.२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
सरळसेवेने परीक्षेव्दारे भरावयाच्या पदाचे नाव व पदसंख्या :-
१) लघुटंकलेखक -२८
२) लघुलेखक (निम्न श्रेणी) – २९
३) लघुलेखक (उच्च श्रेणी) -०३
उपरोक्त पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक ०६/०४/२०२३ ते दिनांक २०/०४/२०२३ या कालावधीमध्ये वेब बेस्ड (Web-Based) ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक ०६/०४/२०२३ ते दिनांक २०/०४/२०२३ या कालावधीमध्ये करता येईल. सविस्तर जाहिरातीमध्ये देण्यात आलेली परीक्षा विषयक सर्व माहिती, रिक्त पदांचा तपशील, आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, अर्हता, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, इत्यादी वाचूनच अर्ज भरावा.
परीक्षा शुल्क, परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षे करिता नोंदणी व इतर अधिक माहिती उमेदवारांस www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर पाहता येईल. सदर जागांसाठी अधिकाधिक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र शासन, कृषी विभाग कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
मध्यवर्ती इमारत, पुणे- ४११ ००१
फोन नं. ०२०-२५५१२८१३ / २५५१०९७८/२५५१२८११
वेबसाईट – www.krishi.maharashtra.gov.in