- प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये आनंद मेळावा; विद्यार्थ्यांनी घेतला विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद
साक्री : विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळावे, शिक्षक- पालक -विद्यार्थी यांचा सुसंवाद वाढाव. नेहमीच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना विरंगुळा प्राप्त होवून त्यांचे मनोरंजन व्हावे, त्यांना विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा. या दृष्टिकोनातून प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, प्रमुख अतिथी विजयश्री रवींद्र खैरनार (साक्री), वैशाली ऋतुराज ठाकरे (प्रतापपूर), वैशाली समाधान पाटील (साक्री), वैशाली विश्वनाथ मोरे (साक्री), राधिका गोपाल खैरनार (काळगाव), वी. वी. पवार, संयोजक श्वेता सोनवणे, धर्मराज अहिरे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख अतिथींचा सत्कार शाल, श्रीफळ व एक वृक्ष देऊन करण्यात आला. प्रसंगी इयत्ता दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींच्या स्वागतासाठी वेलकम अँड मनोरंजन या थीम वर आधारित नृत्य सादर केले. या नृत्याचे मार्गदर्शन तेजस्विनी घरटे, रोहिणी सोनवणे, अश्विनी ठाकरे यांनी केले. प्रमुख अतिथी वैशाली ऋतुराज ठाकरे यांनी फन फेअर निमित्ताने माहिती देताना सांगितले की, प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, खेळ स्पर्धा व कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळेच या शाळेतील विद्यार्थ्यांचा कलागुणांमध्ये वाढ होऊन विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे. विद्यार्थी प्रगतशील होवून शाळेचे दिवसेंदिवस नाव उंचावत आहे. भविष्यात देखील प्रचितीचे नाव असेच उंचावत राहो, असे मनोगत व्यक्त केले. शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी व खाद्यपदार्थांचा आस्वाद लुटता यावा. मिकी माऊस, रेस कार, पालखी, वॉटर बोट अशी विविध साहित्य खेळणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली. या फन फेअर साठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी मसाला पाव, ताक, पाणीपुरी, आईस्क्रीम, दहिवडे, कप केक, मेदुवडा दहिपुरी, वडापाव, फ्रॅंकी, पेस्ट्री, पावभाजी, नूडल्स, डोसा, हराभरा कबाब, सोयाबीन चिली, तवा पुलाव, मंचुरियन कोल्ड कॉफी, चिकन टिक्का, चिकन पुलाव, चिकन बिर्याणी अशा विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. सर्व नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी व पालकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद लुटला. पालकांसाठी चालता बोलता प्रश्नमंजुषा आणि फनी गेम चे आयोजन केले गेले व तीन प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या व फनी गेम मध्ये विजयी असणाऱ्या पालकांना बक्षीस देवून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. या प्रश्नमंजुषा व फनी गेमचे मार्गदर्शन वैष्णवी देवरे, हेमांगी बोरसे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुंदर सेल्फी बॅनर व फलक डेकोरेशन भूपेंद्र साळुंखे, वैष्णवी थोरात, दिपमाला मॅम यांनी केले. सुंदर रांगोळीचे रेखाटन सविता लाडे, देवका चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाचे फोटोग्राफी वैष्णवी मॅम, नम्रता मॅडम तुषार सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या कुपन संदर्भातील जबाबदारी अचूक काटेकोरपणे स्मिता नेरकर, रोहिणी सोनवणे, हिरल सोनवणे, कुणाल पान पाटील यांनी पार पाडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बोरसे, जितेंद्र राजपूत यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन श्वेता सोनवणे, धर्मराज अहिरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.