साक्री : शासकीय माध्यमिक आश्रम शाळा राईनपाडा तालुका साक्री येथे जनजाती कार्य मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सिकलसेल आजार जागरूकता दिवस 19 जून ते 3 जुलै 2024 पंधरवाडा दिवसाच्या निमित्ताने आज राष्ट्रीय सिकलसेल आजार जागरूकता दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रभात फेरी काढून सिकल सेल आजारावर जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आश्रम शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय खैरनार तर प्रमुख पाहुणे म्हणून आर. व्ही. पाटील, आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र रोहड उपस्थित होते. यावेळी सिकल सेल आजाराबाबत आर. व्ही. पाटील, बालाजी उडतेवार, अधीक्षक पन्नालाल पाटील, अधिक्षिका सोनी सूर्यवंशी, विजय खैरनार यांनी मार्गदर्शन केले. तसेच आदिवासी बोली भाषेत सिकल सेल निर्मूलन बाबतीत जनजागृती मार्गदर्शन महाळू गांगुर्डे, कैलास बागुल, ज्योती अहिरे, कल्पना बागुल, अनिल चौरे यांनी केले. यावेळी परिसरातील आश्रम शाळेचे प्रवीण भारुडे, सुनील सोनवणे, रोहिदास गवळी, राजू माळचे, लक्ष्मण कांमडे, पिंट्या बागुल, तुळ्या बागुल, मंजु राऊत, डोंगरी माळशे, रंजना माळचे, येसराम चौरे, सापटबाई पवार, सैल्या पवार, सरूबाई पवार, दहिल्या पवार, नंदा सोनवणे आदी परिसरातील ग्रामस्थ प्रभात फेरी व जागतिक सिकलसेल दिनी सहभागी झाले होते.
राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन अभियान जागतिक सिकलसेल दिन समारंभ 19 जून ते तीन जुलै २०२४ जनजागृती पंधरवाडा आजपासून प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ करण्यात आला. या जनजागृती पंधरवाडा साजरा करताना प्रभात फेरी, सिकलसेल समुपदेशन, जागतिक सिकलसेल दिन समारंभ जनजाती कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी सिकलसेल आजाराच्या जनजागृती करिता माहितीपर चित्रफित, गाव पाडे वस्ती ऐकणे व दाखवणे, सिकलसेल आजारावर जनजागृती पर निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागामार्फत समुपदेशन व जनजागृती, सिकल सेल तपासणी यासह विविध कार्यक्रम व उपक्रम राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियान अंतर्गत जनजागृती पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी मुख्याध्यापक विजय खैरनार, पन्नालाल पाटील , सोनी सूर्यवंशी, चंद्रकांत साळुंखे, बालाजी उडतेवार, ज्योती अहिरे, कल्पना बागुल, कैलास बागुल, अनिल चौरे, अशोक कूवर, कन्हैयालाल परदेशी, मनोज निकम, महाळू गांगुर्डे, प्रवीण कुवर, प्रीतम पिंपळे, यशवंत गावीत, उषा अहिरे, मीना गवळी, विजया देसाई, पुष्पा चौधरी, निलेश गवळी यांच्यासह विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाळू गांगुर्डे यांनी केले. तर आभार पन्नालाल पाटील यांनी मानले.