पिंपळे सौदागर : आंतरराष्ट्रीय योग दिननिमित्त नाना काटे सोशल फौंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक ” हसन तफ्ती” यांनी उपस्थिती लावत सर्वांना योगाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, चंद्रकांत तापकीर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खुळे, प्रशांत सपकाळ, सतिश डोंगरे, काळुराम कवितके, उमेश काटे, सुमित डोळस, जॉन डिसुझा, विशाल बोत्रे, विशाल काळे, सचिन देसाई, गौरव शितोळे, शशांक खांडेकर, निशा शुक्ला, उमा कुलकर्णी, रहाटणी पिंपळे सौदागर मधील आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य उपस्थित होते. परिसरातील जेष्ठ नागरिक, माता भगिनी, तरुण-तरुणी, सोसायटी मधील नागरिक, हॉली इंग्लिश मेडीयम स्कुलचे विद्यार्थी तसेच योगा प्रेमी यांनी शिबीरात उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
नाना काटे सोशल फौंडेशनतर्फे पिंपळे सौदागर येथे योग शिबिर
