पिंपळनेर : येथील प्रचिती पब्लिक स्कूल आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या शाळेचे चेअरमन प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी, प्रमुख अतिथी वैशाली कोरडे, शाळेचे समन्वयक राहूल अहिरे, मुख्याध्यापिका अनिता पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व योगगुरु यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. विद्यार्थीनींनी विविध योग मुद्रा करून योगा डॉन्स सादर केला. प्रमुख अतिथी वैशाली कोरडे यांचे स्वागत श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी केले.
शिक्षिक श्रीमती मयुरी यांनी योग का आणि कसा करावा, त्याच्यापासून होणारे फायदे याबद्दल अशी माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात योग प्रार्थना व ओंकाराने झाली. विविध प्राणायाम ध्यानमुद्रा, योग मुद्रा, वज्रासन वृक्षासन, सूर्यनमस्कार, ताडासन, मरिच्यासन, प्राणायामाचे विविध प्रकार त्याचबरोबर वेगवेगळ्या योगासनाद्वारे माहिती देण्यात आली. यामध्ये, विद्यार्थी व शिक्षकांनी उस्फर्तपणे सहभाग नोंदविला.
शाळेचे समन्वयक राहूल अहिरे, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगा केल्याने आपले शरीर, आरोग्य, स्वास्थ व निरोगी राहते. योग आपल्याला आत्मनिर्भर बनवतो, असे सांगत योगाचे महत्व पटवून दिले. आश्विनी पगार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची रूपरेषा सरिता अहिरे यांनी मांडली.