प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन व वटसावित्री पौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे झाले. या कार्यक्रमाच्या शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे , मुख्य अतिथी व योग मार्गदर्शक म्हणून हेमंत जाधव, शाळा व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाचे पुजन करण्यात आले. त्यानंतर शाळा शिक्षक सपना देवरे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माहिती दिली. योग मार्गदर्शक हेमंत जाधव यांनी शारिरीक, व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. निरोगी जीवनाच्या या पध्दतीला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळेच गेल्या दशकभरापासून दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. हे मार्गदर्शन करून त्यांनी प्राणायाम, मंडूकासन, शवासन, ओमस्वर, मत्स्यासन, व सूर्य नमस्कार हि योगासने विद्यार्थ्यांकडून करून घेतली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुषार सुर्यवंशी यांनी तर संयोजन भूपेंद्र साळूंखे यांनी केले. या कार्यक्रमात इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असा झूमा डान्स चे सादरीकरण केले. या डान्स विषयी मार्गदर्शन वैशाली खैरनार, श्रावण अहिरे यांनी केले. शेवटी योग दिवस व वट सावित्री पौर्णिमा विषयक अनमोल मार्गदर्शन प्रशांत पाटील यांनी केले. मोठ्या उत्साहात व आनंदात या कार्यक्रमाची सांगता झाली.