प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये “वन महोत्सव” व “ग्रीन डे” साजरा
पिंपळनेर : प्रचिती पब्लीक स्कूल पिंपळनेर येथे, वन महोत्सव, ‘व’ ग्रीन डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक राहूल अहिरे, मुख्याध्यापिका अनिता पाटील आदी उपस्थित होते.
“ग्रीन डे” सादरीकरणात सुंदर असे फलक लेखन व रांगोळी रेखाटण्यात आली. तसेच, विद्यार्थ्यांना हिरव्या रंगांचे महत्त्व रिनल सोनवणे यांनी पटवून दिले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचा पोषाख परीधान केला. तसेच, हिरव्या रंगाच्या विविध वस्तू, फुगे, बेडूक, द्राक्ष, मुकुट, आंबा, छत्री, पेन्सील आदी चित्र बनवून त्याचे प्रदर्शन लावण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. यासह, वन महोत्सवानिमीत्ताने वृक्ष लागवड देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधुरी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप काजल राजपूत यांनी आभार प्रदर्शनाने केला.