पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूमध्ये शिक्षक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे चेअरमन प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी सरस्वती माता व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका वैष्णवी भामरे व प्रांजल सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमीत्त साजरा केला जातो. शिक्षक दिन प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खास दिवस असतो. या दिवशी आपण आपल्या शिक्षकांच्या कार्याची आणि त्यांच्या विषयीच्या आदराची भावना व्यक्त करतो, असे सांगितले. त्याचबरोबर शाळेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका यांचा वेशभूषा साकारून वर्ग घेतले. तसेच, सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. १ ली आरुषी बताव, २री आराध्या शेवाळे, ३ री वैभवी पाटील, आराध्या पाटील व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या घोषणा दिल्या.
शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांच्याकडून शाळेच्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या भेटवस्तू देण्यात आल्या. शाळेचे समन्वयक राहूल अहिरे यांनी सर्व शिक्षिकांना शुभेच्छा देवून त्यांच्या हस्ते भेटवस्तू स्विकारल्या. त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी सर्व शिक्षिकांना शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक दिनानिमीत्त दगडूशेठ गणपतीची प्रतिमा शाळेला भेट दिली. स्वयंम भदाणे याने समन्वयक यांची भूमिका साकारली. तर वैष्णवी भामरे या विद्यार्थीनीने मुख्याध्यापिका यांना भूमिका केली. या दोघांनी आपापली भूमिका उत्तमरित्या साकारल्या. विद्यार्थी शिक्षकांनी तासिकेवर जावून अध्यापन केले. मुख्याध्यापिका व समन्वयक यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे निरीक्षण केले.
सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षिकांनी दिलेली नियोजित कामे केली. विद्यार्थ्यांना रांगेत बसविणे – शाळेतून घरी जातांना रांगेत जाणे अशा सर्व प्रकारच्या सूचनांचे पालन केले. निलेश शेवाळे याने आभार मानले. कार्यक्रमासाठी ६ वीच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी रेखाटन केली. मोठया आनंदात विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून शिक्षक दिन साजरा केला.