प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे श्रीगणेश मूर्तीची स्थापना
पिंपळनेर : येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये गणेश चतुर्थी निमित्त वाजत गाजत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली.
श्री गणेश चतुर्थी सणाचे महत्त्व लक्षात घेऊन शाळेत श्री गणेशाचे ढोलताशे वाजत गाजत श्री गणेशाची मूर्ती शाळेत आणण्यात आली. शाळेच्या प्रांगणातील गणेश मूर्तीचे हिंदू संस्कृतीप्रमाणे श्रीकांत पाटील, प्राचार्या अनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शाळेचे संचालक अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळा समन्वयक राहुल अहिरे यांनी पूजन केले. सर्व शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी श्री गणेश आरतीने भाद्रपद तिथी शुभ मुहूर्तानुसार श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. “आला रे आला, गणपती आला …”गणपती बाप्पा मोरया “….अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती आदराचे तसेच प्रथम स्थान दिले आहे. प्रत्येक शुभकार्यासाठी गणपतीचे स्थान महत्त्वाचे व प्रथम मानले जाते. गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते. संपूर्ण भारतामध्ये “गणेशोत्सव” हा सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये गणेशाचे आगमन ढोल ताशांनी केले जाते. सर्व लहान मोठ्यांपासून प्रत्येकाच्या मनात गणपती रायाचे नाव मुखात असते. गणपतीला मोदकाचा प्रसाद भरविण्यात येतो. हिंदू संस्कृतीमध्ये गणपतीचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात राहावे, यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन शाळेत मोठ्या उत्साहात करण्यात आले. या ठिकाणी सुंदर अशी सजावट करण्यात आली. मूर्तीच्या आजूबाजूला देखावे तयार करून फुलांची भव्य आरास काढण्यात आली. दररोज वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकडून मोठ्या श्रद्धेने आणि भक्ती भावाने गणपतीची आरती करण्यात येते. आरतीनंतर गोड प्रसाद वाटप करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संयोजन शिक्षिका माधुरी व शिक्षिका वैशाली यांनी केले. उत्तम सजावट अर्चना, अश्विनी पगार यांनी केली. त्याचबरोबर किरण देवरे यांनी कलश तयार केला.
भगवान शंकर, रिद्धी सिद्धी, शंकर – पार्वती, हिमालय, उंदीर मामा, यांच्या प्रतिमा अतिशय सुंदर रेखाटून त्यांचा देखावा तयार करण्यात आला होता. त्याचबरोबर काजल मॅम व मयुरी मॅडम यांनी सुंदर अशी रांगोळीचे रेखाटन केले.
सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गणेशाच्या आगमनाची तयारी केली. श्री गणेश मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम श्री गणेशाच्या गजरात व मोठ्या भावपूर्ण भक्ती भावनेने आनंदात साजरा करण्यात आला.





















