पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कुल पिंपळनेर येथे वाईट विचारांच्या रावणाचे दहन करून दसरा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेचे समन्वयक राहुल आहिरे, मुख्याध्यापिका आनिता पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाराठी सुंदर असे फलक लेखन रिनल सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विदयार्थीनी अवनी व श्रावणी यांनी केले. दसरा या सणाबद्दल माहिती राहुल देवरे, अनिता पाटिल यांनी दिली.


याच दिवशी प्रभू श्री रामाने रावणाचे दहन केले होते. नऊ रात्रीच्या युद्धानंतर माता दुर्गेने दहाव्या दिवशी महिषासुराचा पराभव केला होता. हा दिवस असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाचे आयोजक कल्याणी काकुस्ते यांनी केले. शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. शाळेचे समन्वयक राहुल अहिरे यांच्या हस्ते वहीपुजन व सरस्वती पूजन, लेखणी तसेच शैक्षणिक साहत्यांचे पूजन करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी गरबा खेळून आनंद व्यक्त केला. सर्व विदयार्थी वेगवेगळ्या पारंपारिक पद्धतीने सुंदर अशी वेशभूषा परिधान करून आले होते. दस-याच्या सणानिमित्त आरव काकूस्ते या विदयार्थाने रामाची भुमिका साकारली.

दशअवतार म्हणजे रावण रावणाची प्रतिमा बनविण्याचे काम किरण देवरे, अर्चना देसले, माधुरी शिंदे, वैशाली वाघ, राहुल अहिरे, पगारे काका तसेच दसरा म्हणजे आपट्याची पाने वाटुन आनंदाणे सोने लुटावे यांसाठी आपट्याची पाने फुल बनवण्याचे काम रिनत सोनवणे, सरिता अहिरे यांनी केले.रावणाच्या हातातील शस्त्र बनविण्याचे काम अर्चना देसले व काजल राजपूत यांनी केले. प्रचिती स्कूलमध्ये गेल्या नऊ दिवसापासुन नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. नऊ दिवसात विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी उत्साहत भाग घेतला. नऊ दिवसाच्या नऊ रंगात विद्यार्थ्यांनी गरबा केला घेतला.शाळेचे समन्वयक राहुल सर अहिरे व विदयार्थी आरव काकुस्ते (रामाच्या भूमिकेत) यांच्या हस्ते विजयोत्सव साजरा करण्यात आला.

आज दशहरा की घड़ी है आई, झूट पर सच्ची जीत हे भाई
रामचंद्रनने रावण मारा, टूट गया अभिमान बिचारा
एक बुराई रोज हटाओ… और दशहरा रोज मनाओ
विजय उत्सवाच्या वेळी विद्यार्थ्यांनी जय श्रीराम जय श्रीरामचंद्र की जय अशा घोषणा करून आनंद साजरा केला. या कार्यक्रमासाठी छायाचित्र व दूरचित्रवाणी शिक्षिका मयुरी व काजल यांनी केली. शाळेतील कर्मचारी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.




















