पिंपळनेर : प्रचिती पब्लिक पिंपळनेर येथे विद्यार्थ्यांना बक्षिस व प्रमाणपत्र वितरण समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. या समारंभाचे आयोजन शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले. शाळेचे समन्वक राहुल अहिरे व प्राचार्या अनिता पाटी यांच्या हस्ते प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव मिळावा, यासाठी प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धांमध्ये मोठ्या हिरहिरीने सहभाग घ्यावा, अशा सदिच्छा यावेळी देण्यात आल्या. नर्सरी ते 8 वीच्या बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शाळेचे समन्वयक राहुल अहिरे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास त्यांचे, कलागुण त्यांच्यात सुप्त गुण बाहेर येण्यासाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यात सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला, अशी उत्तोरोत्तर प्रगती राहो.. अशा शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्राचार्या अनिता पाटील यांनी बक्षीस मिळवलेल्या सर्व विद्यार्थी यांचा गौरव केला. कार्यक्रमाची सांगता पर्व खैरनार इ 6 वी च्या विद्यार्थ्यांनी केली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षिका, शिक्षकेत्तर व कर्मचारी उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभ आनंदात व शांततेत पार पडला.