प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
पिंपळनेर: प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये दिनांक २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेत विविध शैक्षणिक व आरोग्यवर्धक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात योगगुरू पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन व सरस्वती पूजनाने झाली. शाळेचे चेअरमन सर आदरणीय प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वैशाली कोरडे मॅडम उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत शाळेच्या प्राचार्या अनिता पाटील मॅडम यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमाचे समन्वयन राहुल अहिरे सर यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडले. आजच्या कार्यक्रमाचे आयोजन वैशाली जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती बिरारीस यांनी केले. योग दिनानिमित्त शाळेच्या शिक्षिका योजना जाधव यांनी आपल्या भाषणातून योगाचे महत्त्व सांगितले. वैशाली कोरडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शास्त्रीय महत्त्व समजावून सांगितले व विविध योगासने व प्रात्यक्षिके सादर केली. योग प्रार्थना, प्राणायाम, सूर्यनमस्कार, शशंकासन, वक्रासन, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ओंकार चॅटिंग अनुलोम-विलोम, हास्य योगा इत्यादी आसन शिकवले. त्यांच्या मार्गदर्शनात नर्सरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध योगमुद्रा आत्मविश्वासाने सादर केल्याने विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थिनींनी सादर केलेले योग नृत्य, ज्यात विविध योगमुद्रांचे सर्जनशील सादरीकरण करण्यात आले. क्लापिंग योगाद्वारे विविध आसने नृत्यातून सादर करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध योग मुद्रा दर्शविल्या. प्राचार्य अनिता पाटील मॅडम यांनी आपल्या भाषणातून योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. समन्वयक राहुल अहिरे सर यांनी योग आणि शरीरसंपत्ती यामधील नात्याचे महत्त्व पटवून दिले. या वर्षीच्या कार्यक्रमाची थीम होती “One Earth, One Health”, यावर आधारित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या परिसरात आकर्षक रांगोळी किरण देवरे, सायली पवार सरिता अहिरे यांनी काढले, फलक लेखन अर्चना देसले व शीतल शिंपी यांनी केले व सजावट सुनिता जाधव, किरण देवरे, मयुरी सोनार, शितल शिंपी, योजना जाधव, सायली पवार यांनी करून आनंदमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षिका सुनीता जाधव आभार प्रदर्शन करत सर्व पाहुण्यांचे, आदरणीय चेअरमन साहेबांचे सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच कार्यक्रमामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून, त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचा निर्धार व्यक्त केला. एकूणच, हा कार्यक्रम शिस्त, आरोग्य आणि संस्कारांचा संगम साधणारा ठरला.