माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, रमेश थोरात, बाळा भेगडे, काँग्रेसचे युवा नेते विश्वजित कदम, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पुणे मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी आमदार विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे, शरद ढमाले, राष्ट्रवादी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, धावपटू ललीता बाबर अशी सर्वच पक्षातील नेतेमंडळी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. वास्तविक, महाराष्ट्रात अशा मोर्चांची जेव्हा सुरूवात झाली, ती उत्स्फूर्तपणे झाली होती. जसजसा प्रतिसाद वाढू लागला, तसतसे राजकीय मंडळींचा सहभाग वाढू लागला. पुण्याच्या मोर्चात सर्वाधिक राजकीय नेते दिसून आले.