राज्यातील सर्वोत्कृष्ट बँकांमध्ये हस्ती बँकेचा समावेश : चंद्रकांत दळवी
दोंडाईचा : राज्यातील सवरेत्कृष्ट बँकांपैकी हस्ती बँक देखील एक आहे. पुणो शहरात शाखा सुरु करण्याचे त्यांचे धाडस कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था चंद्रकांत दळवी यांनी हस्ती बँकेच्या पुणो येथील शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
राज्यभरात कार्यविस्तार असलेल्या दि हस्ती को-ऑप. बँकेची 21 वी शाखा (दि.13) पुणोकरांच्या सेवेत
रुजू झाली.
पुणो शाखेचे उद्घाटन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. एटीएमचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडीक्सचे फाउंडर चेअरमन पद्मविभूषण के. एच. संचेती यांनी केले. तसेच लॉकर रुमचे उद्घाटन अरविंद खळदकर यांनी केले. यावेळी वाशीम बँकेचे अध्यक्ष सुभाष राठी, बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, उपाध्यक्ष पहलाज माखिजा, बँकेचे संचालक दिलीप वाघेला, यशवंत स्वर्गे, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरीया, असिस्टंट जनरल सुनील गर्गे उपस्थित होते.
बँकेचे संचालक मदनलाल जैन यांनी सांगितले की, बँकेचे आधारस्तंभ कांतीलाल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची प्रगतीपथावर वाटचाल सुरु आहे. जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर यांनी सांगितले की, बँकेची पुणो शहरात शाखा म्हणजे हनुमान उडी आहे, बँकेतून ग्राहकांना उत्तम सेवा द्यावी लागते. बँकेची ही जिद्द व धाडस यशस्वी होईल, असेही त्यांनी सांगितले.
पुना हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे अध्यक्ष मुकुंददास लोहिया यांनी कौतुक केले. यावेळी उद्योगपती राजकुमार चोरडिया, पुना हॉस्पिटलचे संचालक देविचंद जैन, चकोर गांधी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कोथरूड पुणो शाखा सल्लागार समिती सदस्य मदनलाल जैन, पुरुषोत्तम लोहिया, डॉ.शैलेश गुजर, अजय भंडारी, शाखा व्यवस्थापक अनिल मराठे यांनी
परिश्रम घेतले.