पिंपरी :- भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व देशाचे ग्रामविकास मंत्री स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचलित ‘गुरूकुलम्’ मधील भटके, विमुक्त समाजातील वंचित विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने ‘फळे व खाऊ वाटप’ उपक्रम घेण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमरजी साबळे, माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. सुनिल खर्डे सर, भाजपा शहर उपाध्यक्ष दत्ताभाऊ चिंचवडे, शेखरआण्णा चिंचवडे, पाटीलबुवा चिंचवडे, भाजपा सचिव मधुकर बच्चे, भाजयुमोचे प्रदेश सदस्य अजित कुलथे, किसान आघाडीचे अध्यक्ष संतोष तापकीर, भाजपा मंडल सरचिटणीस नंदू भोगले, भाजयुमोचे उपाध्यक्ष सतीश नागरगोजे, रामदास काळजे, अतुल चिंचवडे, स्वप्निल कुलकर्णी, ओंकार भोईर, प्रथमेश रत्नपारखी, शुभम पोरे, स्वप्निल शेडगे, प्रा. अवचार सर व आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.