नवी दिल्ली : राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी आणि त्यांचे कार्य कोणाला माहीत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वांचे लाडके बापू म्हणजेच महात्मा गांधी यांचे निधन झाले. 30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर नथुराम गोडसेने बिर्ला हाऊसमध्ये गांधीजींवर गोळ्या झाडल्या होत्या.
दरवर्षी या दिवशी म्हणजेच 30 जानेवारीला संपूर्ण भारतात शहीद दिन साजरा केला जातो. वास्तविक, देश महात्मा गांधींची पुण्यतिथी शहीद दिन (शहीद दिवस 2023) म्हणून साजरी करतो. महात्मा गांधींच्या देशासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन ‘बापू’ यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारीला शहीद दिन साजरा केला जातो.
श्रद्धांजली वाहिली जाते
शहीद दिनाच्या दिवशी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री असे अनेक मोठे राजकारणी दिल्लीतील राजघाटावर गांधीजींच्या समाधीवर पोहोचतात. जिथे त्यांची आठवण करून त्यांना पुष्पहार अर्पण करतात. यासोबतच देशाच्या सशस्त्र दलातील हुतात्म्यांनाही या दिवशी अभिवादन केले जाते.
दोन मिनिटे मौन
विशेष म्हणजे महात्मा गांधी हे सत्य, अहिंसा, साधेपणाचे विलक्षण व्यक्तिमत्व होते. भारताला धर्मनिरपेक्ष आणि अहिंसक राष्ट्र म्हणून कायम ठेवण्याचे ते खंबीर पुरस्कर्ते होते. बापूंच्या स्मरणार्थ आणि हुतात्म्यांच्या योगदानासाठी देशभरात दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.