पिंपरी: पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मनपाच्या विविध कार्यालयांना वाय–फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याकरीता आवश्यक यंत्रणा मनपाच्या कार्यालयांमध्ये उभारणेत आली आहे. सद्यस्थितीत महानगरपालिका मुख्य कार्यालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्नालय (YCMH) येथे वाय-फाय सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. इतर कार्यालयांमध्ये देखील ही सेवा कार्यान्वित करण्यात येत आहे. वाय-फाय सुविधेचा लाभ महानगरपालिकेच्या अधिकारी / कर्मचारी व महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये येणा-या नागरिकांना मिळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी दिली.
असा घेता येणार वाय-फाय सुविधेचा लाभ: –
- प्रथमत: आपल्या मोबाईल मधील सेटींगमध्ये जाऊन वाय- फाय सुविधा इनैबल्ड करावी. तद्नंतर Available Network मध्ये PCMC Smart City हा Option वर क्लिक करावे.
- आपल्या मोबाईलवरील स्क्रीन मधील पीसीएमसी ऑफीसर/ स्टाफ युजर्स या ऑप्शन वर क्लिक करावे.
- पीसीएमसी स्टाफ युजर्स या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर नवीन स्क्रीन उपलब्ध होईल. सदर स्क्रीन मध्ये एम्पॉई आयडी या रकान्यात आपला कर्मचारी क्रमांक नमुद करावयाचा असून पासवर्ड हा सेवानिवृत्ती चा दिनांक आहे. त्यामध्ये दिनांक, महिना व सेवा निवृत्ती दिनांकाचे फक्त वर्ष नमुद करावयाचे आहे. (उदा. Employee ID – ९९९९, Password – १०११३१) तद्नंतर I accept the Terms and Condition येथील चेक बॉक्स वर क्लिक करावयाचे आहे.
- सदर स्क्रीनवर माहिती समाविष्ठ केल्यानंतर आपल्या मोबाईल वरील माहिती दिसेल.
- समाविष्ठ केल्यानंतर आपल्या मोबाईलवर वाय – फाय सुविधा कार्यान्वित होऊन You’re connected to PCMC Smart City Wi-Fi अशी सुचना प्राप्त होऊन वाय-फाय सुविधा कार्यान्वित होईल.
पॉलिसी नुसार वाय–फाय स्पीड निर्धारित :-
शहरामध्ये २१५ ठिकाणी वाय- फाय लावण्यात आले आहे. यापैकी ८७ ठिकाणी वाय-फाय सूरू आहे. ७६० एक्सेस पॉईंटपैकी ३५७ पॉईंट सध्या लाईव्ह करण्यात आले आहेत. नमुद कार्यपध्दतीचा वापर केल्यानंतर आपल्या मोबाईलद्वारे वाय – फाय सुविधा कार्यान्वित होईल. सदर वाय –फाय सुविधेद्वारे मनपाने निर्धारित केलेल्या पॉलिसीनुसार यु- टयुब व कायद्याने प्रतिबंधित साईट उपलब्ध होणार नाहीत. तसेच वाय-फाय पॉलिसीनुसार वाय-फाय स्पीड निर्धारित करण्यात आलेला आहे.
वाय- फाय एकवेळेस कनेक्ट केल्यानंतर पुढील चोवीस तासांकरीता पुनश्च: लॉगिन करण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच मनपाच्या इतर कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतरही पुनश्च: लॉगिन करण्याची आवश्यकता भासणार नाही. सुविधा तेथील उपलब्ध असणा-या असेस पॉईंट (AP) द्वारा कार्यान्वित राहील.
वरील पध्दतीनुसारच लॅपटॉप व टॅब करीता वाय-फाय सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे मनपा कार्यालयात येणा-या नागरिकांना देखील सदर सेवेचा लाभ घेता येणार असून त्यांनी मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर त्यांचे मोबाईलवर OTP प्राप्त होईल. त्याद्वारे नागरिकांना सुध्दा वाय- फाय सुविधेचा लाभ घेणे शक्य होणार आहे. या पध्दतीनुसार वाय- फाय सुविधा कार्यान्वित करण्याकरीता काही तांत्रिक अडचण निर्माण होत असल्यास मे. एल अँड टी या संस्थेचे फिल्ड इंजिनिअर मोबाईल क्र. ९५५२३९२१३०, ९५०३१८६८१९ व ७३७२०३६०५१ येथे संपर्क करावा, असे आवाहन श्री. निळकंठ पोमण यांनी केले आहे.