प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उधळले जीवनाचे रंग
वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त विविध नृत्यांमध्ये रंगले विद्यार्थी
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये 4 जानेवारी 2024 रोजी इयत्ता दुसरी ते बारावी या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना अभ्यासातून थोडासा विरंगुळा होण्यासाठी व विद्यार्थ्यांची विविध कलागुण, कौशल्य विकसित व्हावी, मुलांमध्ये उत्साह व आनंद व त्यांची अभिरुची वाढावी, या दृष्टिकोनातून सांस्कृतिक कार्यक्रम : जीवनाचे रंग ( colour of life ) या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील (पुणे ), कविता पाटील (पुणे), प्रमुख अतिथी मनीषा खैरनार (विटाई), प्रियंका पाटील (नवडणे), रूपाली ठाकरे (कळंभीर), माधुरी सोनवणे (मलांजन), लताबाई बदामे ( निजामपूर ), ललिता सोनवणे (मालपुर ), पुनम नेरकर (देऊर), रंजना भामरे (नाडसे), वैष्णवी पवार (दिघावे), अनिता वेंडाईत (आखाडे), प्रियंका खैरनार (काळगाव ) यांच्या हस्ते सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज व नृत्य कलेचे ईश्वर नटराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथींचा सत्कार शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, कार्यक्रमाचे संयोजक, तुषार सूर्यवंशी , स्मिता नेरकर , वैशाली खैरनार यांच्या हस्ते शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ललिता सोनवणे (मालपुर) यांनी शाळेचे विशेष कौतुक केले. साक्री तालुक्यात सलग चार वर्षापासून उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार मिळवणाऱ्या प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपले विद्यार्थी शिकत असल्याचा मला अभिमान आहे. येथील शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास घडवून सर्वांगीण विकास साधत असतात. विविध खेळ, उपक्रम, स्पर्धा आयोजित करून त्यांच्या गुण कौशल्यात वाढ होत असते. या शाळेतून अनेक चांगले खेळाडू अनेक चांगले चित्रकार तसेच बुद्धिवान विद्यार्थी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य यामुळे उज्वल आहे. भविष्यात विद्यार्थी चांगल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून प्रगती करतील, असा विश्वास असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच, 2021 ते 2024 पर्यंत उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळविणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला. 2024 मध्ये साक्री तालुक्यातील उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार प्रशांत भीमराव पाटील, उत्कृष्ट मुख्याध्यापिका पुरस्कार वैशाली लाडे, उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार वैभव सोनवणे, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार तुषार देवरे, धर्मराज अहिरे, कुणाल देवरे, उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार नीतू पंजाबी, स्मिता नेरकर, श्वेता सोनवणे, सपना देवरे, वैशाली खैरनार, कांचन अहिरराव यांचा प्रशांत भीमराव पाटील यांच्याहस्ते शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
वेलकम सॉंग (इयत्ता चौथी ब) या नृत्याने कार्यक्रमाची सूरूवात झाली. यानंतर शिवसूत्र (शिवतांडव -दुसरी अ/ब), नवरा पाहिजे गोरा गोरा (दुसरी अ /ब ), सौदा खरा खरा (दुसरी अ/ब ), जुबी डुबी (कपल डान्स -दुसरी अ/ब), एक दो तीन माधुरी दीक्षित (तिसरी अ/ब), ये ग ये मैना (तिसरी अ/ब), यादो की बारा (तिसरी अ/ब), ओ शेठ (तिसरी अ/ब), जय शिवराय जय शंभुराजे (चौथी अ), मॉ तुझे सलाम (चौथी अ), एरु चाले आदिवासी चाले (चौथी अ), आदि योगी (चौथी ब), लकडी की काठी (चौथी ब), युनिटी अँड ड्रायव्हर सिटी (पाचवी अ), अमिताभ बच्चन सॉंग (पाचवी अ), विठ्ठल डान्स (पाचवी अ), परम सुंदरी (पाचवी ब), डान्स का भूत (पाचवी ब), पंजाबी सॉंग (पाचवी ब), शिवाजी महाराज झुलवा पाळणा (सहावी ), खंडोबा टीम (सहावी ), झाशी की राणी (सहावी), हरा रंग डाला फनी डान्स (सातवी अ), इतनी सी हसी इतनी खुशी (सातवी अ), गणपती चे गाणे (सातवी अ), उडी उडी जाय (सातवी ब), राम सियाराम राम थीम (सातवी ब), चलो इश्क लडाये (गोविंदा थीम- सातवी ब ) च्या विद्यार्थ्यांनी उत्साहामध्ये नृत्याचे सादरीकरण केले.
यासाठी सर्व वर्ग शिक्षक व विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी शालेय वार्षिक अहवालाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता नेरकर, जितेंद्र राजपूत यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन वैभव सोनवणे, तुषार सूर्यवंशी, स्मिता नेरकर, वैशाली खैरनार यांनी केले. सुंदर सजावट भूपेंद्र साळुंखे, सुंदर रांगोळीचे रेखाटन वैष्णवी थोरात, सविता लाडे, दीपमाला, अश्विनी मॅडम, प्रभावती मॅम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वर्गाचे इतर कर्मचारी वर्गाचे व वाहन चालक वर्गाचे सहकार्य लाभले.