पिंपळनेर : येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये 5 फेबुवारी 2023 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध भारतीय नृत्य सादरीकरणाद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. निमीत्त होते ते स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे. प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात आणि थाटात पार पडले.
कार्यक्रमास शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील, सेक्रेटरी कविता पाटील, प्राचार्या अनिता पाटील, व्यवस्थापक राहुल अहिरे, प्रमुख अतिथी शितल बच्छाव (दहिवेल), निशा कदम (चिकसे), हर्षदा देवरे (उंभरे), गायत्री शिंदे (सामोडे), आशा पाटील (पिंपळनेर), शर्मिला शिंदे (सामोडे), शितल एखंडे, मयुरी नांद्रे, भारती अहिरे (पिंपळनेर) मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता व नृत्याची देवता नटराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख अतिथींचा सत्कार स्मृतीचिन्ह व पुष्प देवून करण्यात आला. ‘संस्कृती’ ही माणसाच्या आशयाची आणि चारित्र्याच्या प्रमुख रचना असून आपले वर्तन हे आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब असते. आपली संस्कृती आपण कोण आहोत, हे सर्वात जास्तु पारिभाषिक केले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती अद्वितीय आणि इतरांपेक्षा वेगळी आहे. हे मुख्यत्वे त्यांच्या संस्कृतीमुळे आहे, असे मनोगत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर विदयार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास केला जातो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नर्सरी ते सातवीच्या विदयार्थ्यांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने केलेल्या नृत्याविष्काराने सर्वांचे मन मोहित केले. लहान विद्यार्थ्यांनमध्ये उत्साह, आनंद त्याच्या नृत्यातून फुलून आला होता. सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या नृत्यातून आपली संस्कृती म्हणजेच सणांचे महत्त्व पटवून दिले. गुडीपाडवा दिवाळी, दसरा, मंगळागौर, गणपती, राम, हनुमान चालीसा, छत्रपती शिवाजी, विठ्ठ माऊली या सर्व गाण्यांमधून “आपली संस्कृती आपला अभिमान“ विद्यार्थ्यांनी नृत्यातून जाणून घेतला. त्याचबरोबर विदयार्थ्यांच्या गाण्याची निवड व नृत्याविष्कार हा शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांकडून आपल्यातील कलागुण दाखविले. या कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळीचे रेखाटन रीनल मॅम, वैशाली मॅम, कल्याणी मॅम, मयुरी मॅम, सरिता मॅम, मंगला मॅम यांनी केले. तसेच, स्टेज डेकोरेशन माधुरी मॅम, आश्वीनी मॅम यांनी केले. दीप प्रज्वलन सजावट किरण मॅम व सुनिता मॅम यांनी केले. व्यासपीठ सजावट रांगोळी तेजल मॅम यांनी काढली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अश्विनी पगार, सुनिता मॅम, काजल राजपुत मॅम यांनी केले. संयोजन अर्चना देसले, काजल राजपूत यांनी केले. शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मोलाचे सहकार्य केले.